Steve Smith | Australia vs Pakistan X/cricketcomau
क्रीडा

AUS vs PAK: नया है यह! स्मिथने केली तक्रार अन् टेपच्या एका गोळ्यामुळे थांबवला सामना, पाहा Video

Steve Smith: स्मिथने काळ्या टेपच्या एका बोळ्याबद्दल तक्रार केल्याने काही वेळासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना थांबला होता.

Pranali Kodre

Steve Smith complaint about small bundle of black tape near sight screen that halted play for five minutes:

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले असून तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर बुधवारपासून (3 जानेवारी) सुरु झाला आहे. दरम्यान, याच सामन्यात एक अनोखी घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या सामन्यात तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरु असताना 70 व्या षटकावेळी स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्युशेन फलंदाजी होते. पण 70 वे षटक संपल्यानंतर स्मिथने साईटस्क्रिनच्या बाजूला पडलेल्या काळ्या टेपच्या छोट्या बोळ्यामुळे लक्ष विचलित होत असल्याची तक्रार केली.

दरम्यान, सुरुवातीला कोणालाही तो कशाबद्दल तक्रार करतोय हे समजले नाही, मात्र ज्यावेळी समजले, त्यावेळी समालोचकही आश्चर्यचकीत झाले होते. यावेळी त्याच्या तक्रारीमुळे पंचांनी ग्राऊंड्समनला मैदानात बोलावले आणि स्मिथशी बोलायला सांगितले.

त्यानंतर काही ग्राऊंड्समन साईट स्क्रिनच्या बाजूला असलेल्या मोठ्या पांढऱ्या पडद्यापाशी गेले आणि मग एका ग्राऊंडमनने वरचढून मोठ्या प्रयत्नाने तो टेपचा गोळा उचलला आणि मग तो खाली आला. दरम्यान, तो बोळा खाली आणल्यानंतर त्या ग्राऊंड्समनने सेलिब्रेशनही केले. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. त्यावर अनेक कमेंट्सही आल्या आहेत.

या घटनेमुळे जवळपास पाच मिनिटे सामना थांबला होता. मात्र, तो बोळा बाजूला केल्यानंतरही स्मिथ फार काळ टिकू शकला नाही आणि 74 व्या षटकात मीर हामझाच्या गोलंदाजीवर बाबर आझमकडे झेल देत बाद झाला. त्याने 86 चेंडूत 38 धावांची खेळी केली.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले,तर पाकिस्तानचा पहिला डाव 77.1 षटकात 313 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 109.4 षटकात 299 धावांवर संपला. त्यामुळे पाकिस्तानला 14 धावांची आघाडी मिळाली. मात्र, दुसऱ्या डावात पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली. तिसऱ्या दिवसाखेर पाकिस्तानने 26 षटकात 7 बाद 68 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT