Goa Cricket Association  Dainik Gomantak
क्रीडा

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत स्टॅमिना क्लबची घोडदौड कायम

ब गट क्रिकेट : सम्राट क्लबला नमवून उत्तर विभागीय अंतिम फेरीत

Kishor Petkar

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या ब गट क्रिकेट स्पर्धेत तिसवाडी विभागीय विजेतेपद मिळविलेल्या स्टॅमिना क्रिकेट क्लबची आगेकूच कायम आहे. शुक्रवारी त्यांनी सम्राट स्पोर्टस क्लबला 50 धावांनी हरवून स्पर्धेची उत्तर विभागीय अंतिम फेरी गाठली.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झालेल्या लढतीत अष्टपैलू रुपेश सर्वणकर स्टॅमिना क्लबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. संघाच्या कर्णधाराने 39 धावा केल्या, तसेच तीन गडीही बाद केले. स्टॅमिना क्लबने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 222 धावा केल्या, नंतर सम्राट क्लबचा डाव 172 धावांत संपुष्टात आला.

उत्तर विभागीय अंतिम लढतीत स्टॅमिना क्लबसमोर डिचोली क्रिकेट क्लबचे आव्हान आहे. हा सामना शनिवारी (ता. 28) पर्वरी येथेच खेळला जाईल.

संक्षिप्त धावफलक

स्टॅमिना क्रिकेट क्लब : 40 षटकांत 8 बाद 222 (सचिन सरदेसाई 20, प्रमोद नाईक 16, ओमकार भंडारी 37, आदित्य दीक्षित 33, सागर वंटमुरी 31, रुपेश सर्वणकर 39, कृष्णा ठाकूर नाबाद 15, तेजस देसाई 1-38, साहिल आरोलकर 2-44, कुणाल थोरात 2-31, गौरव नाईक 1-45, जयेश गडेकर 1-5) वि. वि. सम्राट स्पोर्टस क्लब : 34.4 षटकांत सर्वबाद 172 (संतोष तुळसकर 31, विनोद नाईक 21, आशिष नाईक 39, तेजस देसाई 18, साहिल आरोलकर 20, हर्ष जेटाजी 3-36, संचित खन्ना 2-25, कृष्णा ठाकूर 1-21, रुपेश सर्वणकर 3-37, सागर वंटमुरी 1-12).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संयुक्त अरब जागृती! - संपादकीय

US Iran War: अखेर युद्ध थांबलं! ट्रम्प प्रशासनाची मोठी घोषणा, पण घातली 'ही' कडक अट

Mapusa Electric Scooter Protest: "90 हजारांची बॅटरी परवडणार कशी" ? म्हापशात ई-स्कूटरची चक्क बँजो वाजवत धिंड !

"वकील उपस्थित होते, मग उलटतपासणी का केली नाही"? 5 वर्षांनंतर 'त्या' प्रकरणी शहाणपण सुचलेल्या संशयिताला कोर्टानं झापलं

VIDEO: "बंदुकीसह सिक्युरिटी चेकपॉईंट तोडून घुसला हल्लेखोर!" ट्रम्प प्रकरणातील नव्या व्हिडिओनं उडवली खळबळ; तपास यंत्रणांचे दणाणले धाबे

SCROLL FOR NEXT