Gujarat Titans
Gujarat Titans Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलेला 'कॅप्टन' घेणार Gujarat Titans संघात विलियम्सनची जागा

Pranali Kodre

Dasun Shanaka Joins Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होऊन आता आठवडाच होत आहे. पण गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला पहिल्या सामन्यात मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख फलंदाज केन विलियम्सन पहिल्याच सामन्यात दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो मायदेशीही परतला आहे.

आता गुजरात टायटन्सने विलियम्सनचा बदली खेळाडू श्रीलंकेचा टी20 कर्णधार दसून शनकाची आयपीएल 2023 साठी निवड केली आहे. शनका सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे.

त्याने जानेवारी महिन्यात भारताविरुद्ध खेळताना टी20 मालिकेत चांगली अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत एका अर्धशतकासह 62 च्या सरासरीने 124 धावा केल्या होत्या. तसेच २ विकेट्सही घेतल्या होत्या. त्याने भारताविरुद्ध अखेरच्या 6 टी20 डावात 47*,74*,33*,45,56*,23 अशा धावा केल्या आहेत.

शनकाने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 182 टी20 सामने खेळले असून 141.78 च्या स्ट्राईक रेटने 3709 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकांचा आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 59 विकेट्स घेतल्या आहेत.

अशी झाली विलियम्सनला दुखापत

आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना विलियम्सनला गुडघ्याची दुखापत झाली. त्यामुळे आता त्याला या संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर व्हावे लागले आहे. तो पुढील उपचारासाठी मायदेशी परतला आहे.

विलियम्सन पहिल्या सामन्याच्या 13 व्या षटकात सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने मारलेल्या मोठ्या फटक्यावर चेंडूला सीमापार जाण्यापासून रोखताना जखमी झाला होता. चेंडू आडवताना तो त्याच्या उजव्या गुडघ्यावर पडल्याने त्याचा गुडघा दुखावला गेला.

त्यामुळे त्याच्यावर लगेचच मैदानावर उपचार करण्यात आले होते. पण त्याला नीट चालताही येत नसल्याने तो मेडिकल स्टाफच्या मदतीने मैदानातून बाहेर गेला. त्यानंतर तो मैदानात उतरला नाही. त्याच्या जागेवर फलंदाजीसाठी साई सुदर्शन इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला होता.

केन विलियम्सनला आयपीएल 2023 लिलावातून हार्दिक पंड्या कर्णधार असेलल्या गुजरात टायटन्स संघाने 2 कोटी रुपयांच्या त्याच्या मुळ किमतीत खरेदी केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT