FC Goa  Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट चमूत मुख्य संघातील तिघांची वर्णी

आगामी रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेसाठी त्यांचा 24 सदस्यीय संघ शनिवारी जाहीर करण्यात आला.

Kishor Petkar

पणजी: एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट चमूत आयएसएल स्पर्धेत खेळलेल्या मुख्य संघातील तिघांची वर्णी लागली. आगामी रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेसाठी त्यांचा 24 सदस्यीय संघ शनिवारी जाहीर करण्यात आला.

डेव्हलपमेंट लीग स्पर्धेत आठ संघांचा समावेश असून स्पर्धा 15 एप्रिल ते 12 मे या कालावधीत दक्षिण गोव्यातील नागोवा व बाणावली येथील मैदानावर खेळली जाईल. एफसी गोवाचा (FC Goa) स्पर्धेतील पहिला सामना 15 रोजी चेन्नईयीन एफसीविरुद्ध होईल. (Sports Update Fc Goa Football Team Latest news)

एफसी गोवाच्या उदयोन्मुख संघात निवडलेले गोलरक्षक ह्रतीक तिवारी, मध्यरक्षक ब्रायसन फर्नांडिस व डॅन्स्टन फर्नांडिस हे आयएसएल स्पर्धेतील मुख्य संघाचे सदस्य होते. डेगी कार्दोझ संघाचे मुख्य प्रशिक्षक असून झेवियर एस्ट्रोसियो सहाय्यक प्रशिक्षक, तर सुगितेश मांद्रेकर गोलरक्षक प्रशिक्षक आहेत. संघात बहुतेक 21 वर्षांखालील खेळाडू आहेत. स्पर्धा नियमानुसार लेस्ली रिबेलो, डेल्टन कुलासो, मानूशॉन फर्नांडिस व आयव्हन कॉस्ता हे चार खेळाडू 23 वर्षांखालील आहेत.

एफसी गोवा डेव्हलपमेंट संघ

गोलरक्षक : ह्रतीक तिवारी, हॅन्सेल कुएल्हो, विद्देश भोसले, बचावपटू ः दिशांक कुंकळीकर, डेल्झान पासान्हा, रायन मिनेझिस, लेस्ली रिबेलो, अलिस्टर फर्नांडिस, आदित्य साळगावकर, मानूशॉन फर्नांडिस, मलिकजान कलेगर, मध्यरक्षक : माल्सॉमत्लुआंगा, ब्रायसन फर्नांडिस, लालरेमरुआता एचपी, डेल्टन कुलासो, डॅन्स्टन फर्नांडिस, जॉर्डन बोर्जिस, व्हेलरॉय फर्नांडिस, आयव्हन कॉस्ता, आघाडीपटू ः जोव्हियल डायस, वासिम इनामदार, सेल्जियो डायस, मेव्हन डायस, ब्रिटो परेरा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT