Honoring hockey players, coaches and promoters at Margao, Goa. On 29 July, 2021. Sports Manguesh Borkar / Dainik Gomantak
क्रीडा

Sports: हॉकी खेळाडू. प्रशिक्षक व प्रवर्तकांचा मडगावात सत्कार

टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympics) जागृती कार्यक्रमाअंतर्गत बागेत सत्कार (Sports)

Mangesh Borkar

फातोर्डा: गोवा ऑलिंपिक असोसिएशन व गोवा क्रिडा प्राधिकरणाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या टोकियो ऑलिंपिक जागृती कार्यक्रमाअंतर्गत मडगाव नगरपालिका आगाखान बागेत गोवन हॉकी असोसिएशनने शिफारस केलेले हॉकी खेळाडू, प्रशिक्षक व प्रवर्तकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गोवन हॉकीचे अध्यक्ष शावियर मार्कुस, सचिव बेनी व्हीएगस तसेच कार्यकारी समिती सदस्य श्रीमती नेली रॉड्रिग्स व नावेली येथील परपेच्युअल सुकोर कॉनवेंट हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिबराडा हे सन्माननिय अतिथी म्हणून उपस्थित होते. (Sports)

या प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून लिनो डिसोझा, नॉबर्ट फर्नांडिस, फ्रांसिस रेबेलो, ज्योकिना मास्कारेन्हस व क्लिफर्ड फर्नांडिस यांचा समावेश आहे. लिनो डिसोझा हे हॉकीचे प्रवर्तक. त्यांनी 1993 ते 2006 या कालावधीत आंतरशालेय हॉकी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. शिवाय महिला हॉकी गोव्यात जिवंत ठेवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. नॉबर्ट फर्नांडिस हे गुडी, पाड्डे येथील दामोदर इंग्लिश हायस्कुलचे मुख्याध्यापक तसेच हॉकी प्रशिक्षक आहेत. त्यानी आपल्या शालेय हॉकी संघाला उच्च स्तरावर नेऊन नेहरु कप हॉकी स्पर्धेतही पात्रता मिळवुन दिली होती.

फ्रांसिस रेबेलो हे माजोर्डा येथील सेंट अँथोनी हायस्कुलचे शारिरिक शिक्षणाचे शिक्षक. त्यांनी आपल्या शालेय संघाला राज्य अजिंक्यपदे मिळवुन दिली. श्रीमती ज्योकिना मास्कारेन्हसन या परपेच्युअल सुकोर कॉनवेंट हायस्कुलच्या शारिरीक शिक्षिका आहेत. हॉकी इंडियातर्फे आयोजित हॉकी प्रशिक्षण लेव्हल 1 परिक्षा उत्तिर्ण होणाऱ्या त्या एकमेव गोमंतकीय आहेत. क्लिफर्ड फर्नांडिस यांची 2004 साली ज्युनियर भारतीय निवड चाचणी शिबिरात निवड झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT