Team India BCCI
क्रीडा

SA vs IND: तिसऱ्या T20I मध्येही पावसाचा अडथळा? पाहा कसे असेल जोहान्सबर्गमधील हवामान

India vs South Africa: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरुवारी जोहान्सबर्गमध्ये तिसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 3rd T20I Match at Johannesburg, Weather Update:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सध्या टी20 मालिका सुरु आहे. या टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना गुरुवारी (14 डिसेंबर) जोहान्सबर्गमधील न्यू वाँडरर्स स्टेडियमवर होणार आहे.

हा सामना भारतासाठी करो वा मरो सामना आहे. कारण या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिका या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.

त्यामुळे जर तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला, तर ते मालिकाही जिंकतील, पण जर तिसरा सामना जिंकण्यात भारतीय संघाला यश मिळाले, तर मालिका बरोबरीत सुटेल.

या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही पावसाचा अडथळा आला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही पावसाचा अडथळा येणार का असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला असेल.

दरम्यान, जोहान्सबर्गमधील वातावरण पहिल्या दोन्ही सामन्यांच्या तुलनेत चांगले असणार आहे. Accuweather च्या रिपोर्टनुसार जोहान्सबर्गमध्ये गुरुवारी पावसाची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे सामन्यात पावसाचा अडथळा येण्याची शक्यताही कमी आहे. दरम्यान, वातावरण मात्र ढगाळ राहू शकते.

जोहान्सबर्गमध्ये दिवसा 28 डिग्री सेल्सियस तापमान राहू शकते, तर सामन्याच्या दरम्यान संध्याकाळी साधारण 18 डिग्री सेल्सियस तापमान असू शकते.

जोहान्सबर्गमधील आकडेवारी

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात जोहान्सबर्गमध्ये 3 टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील दोन सामन्यात भारताने, तर एका सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे.

तसेच या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आत्तापर्यंत 14 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यातील 5 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर 6 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच 3 सामने अनिर्णत राहिले आहेत.

असे आहेत संघ -

  • भारत - यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.

  • दक्षिण आफ्रिका - एडन मार्करम (कर्णधार), ओटनियल बार्टमन, मॅथ्यू ब्रिट्झके, नांद्रे बर्गर, डोनोव्हन फरेरा, रिझा हेन्ड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, ताब्राईज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझार्ड विल्यम्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT