India vs South Africa  BCCI
क्रीडा

SA vs IND, 3rd T20I: द. आफ्रिकेने जिंकला टॉस! 'हा' खेळाडू करणार पदार्पण, पाहा प्लेइंग-11

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात टॉस जिंकला आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 3rd T20I Match at Johannesburg, Playing XI:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सध्या टी20 मालिका सुरु आहे. या टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना गुरुवारी (14 डिसेंबर) जोहान्सबर्गमधील न्यू वाँडरर्स स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. पण दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. त्यांनी केशव महाराज, नांद्रे बर्गर आणि डोनोव्हन फरेरा यांना संधी दिली आहे. बर्गर या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण करणार आहे.

दक्षिण आफ्रिकेने गेराल्ड कोएत्झी आणि मार्को यान्सिन यांची कसोटी मालिकेच्या दृष्टीने तिसऱ्या टी२० साठी निवड केली नव्हती. त्यामुळे ते या सामन्याचा भाग नाहीत, तर फरेराला ट्रिस्टन स्टब्सच्या जागेवर संधी मिळाली आहे.

निर्णायक सामना

हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक सामना आहे. कारण या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिका या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.

त्यामुळे जर तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला, तर ते मालिकाही जिंकतील, पण जर तिसरा सामना जिंकण्यात भारतीय संघाला यश मिळाले, तर मालिका बरोबरीत सुटेल.

प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार

  • दक्षिण आफ्रिका - रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्करम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुक्वायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, ताब्राईज शम्सी, नांद्रे बर्गर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

SCROLL FOR NEXT