India vs South Africa | KL Rahul BCCI
क्रीडा

SA vs IND: पहिल्या वनडेतून 'या' दोन खेळाडूंचे पदार्पण, पाहा भारत-द. आफ्रिकेची प्लेइंग-11

South Africa vs India: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी होणाऱ्या पहिल्या वनडेतून दोन खेळाडू पदार्पण करणार आहेत.

Pranali Kodre

South Africa vs India, 1st ODI at Johannesburg, Playing XI:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेला रविवारी (17 डिसेंबर) सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्गमधील न्यू वाँडरर्स स्टेडियममध्ये खेळला जात आहे.

पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेकडून नांद्र बर्गर याच वनडे पदार्पण होत आहे. तसेच भारताकडूनही साई सुदर्शन या युवा खेळाडूला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

याशिवाय ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमारस आवेश खान, संजू सॅमसन, अक्षर पटेल यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. दरम्यान, रिंकू सिंगला मात्र वनडे पदार्पणासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, बर्गर दक्षिण आफ्रिकेकडून वनडेत पदार्पण करणारा 149 वा खेळाडू ठरला आहे. तसेच साई सुदर्शन भारताकडून वनडे पदार्पण करणारा 253 वा खेळाडू ठरला आहे.

हा भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्डकप 2023 नंतरचा पहिलाच वनडे सामना आहे.

आमने-सामने आकडेवारी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात आत्तापर्यंत 91 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 38 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर 50 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. त्याचबरोबर 3 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

  • दक्षिण आफ्रिका - रिझा हेंड्रिक्स, टोनी दे झोर्झी, रस्सी वॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडील फेहलुक्वायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, ताब्राईज शम्सी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT