South Africa Team  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: रबाडाने घातला कांगारुंच्या वर्मी घाव, ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव

एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup-2023) 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव झाला.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup-2023) 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव झाला. लखनऊ येथे गुरुवारी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या 10 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी पराभव केला.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकात 7 विकेट गमावत 311 धावा केल्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ 40.5 षटकात 177 धावांवर सर्वबाद झाला.

दरम्यान, 312 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. संघाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर सुरुवातीपासूनच आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले.

मिचेल मार्श 15 चेंडूत 7 धावा करुन बाद झाला. पुढच्याच षटकात वॉर्नर 13 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्युशेन यांच्यात भागीदारी होत असतानाच स्मिथ आऊट झाला. जोश इंग्लिसला रबाडाने क्लीन बोल्ड केले.

ग्लेन मॅक्सवेल केवळ 3 धावा करु शकला. मार्कस स्टायनिसने 5 धावांचे योगदान दिले. मिचेल स्टार्कने 27 धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.

पॅट कमिन्सने काही मोठे फटके खेळले आणि 22 धावांचे योगदान दिले. तबरेझ शम्सीने 41व्या षटकात दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा (Australia) डाव संपवला.

दुसरीकडे, क्विंटन डी कॉकच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 7 गडी गमावून 311 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 106 चेंडूत 109 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ग्लेन मॅक्सवेल ठरला, ज्याने 10 षटकात 34 धावा देऊन दोन बळी घेतले. मिचेल स्टार्कने दोन बळी घेतले. 312 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली.

प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि टेम्बा बावुमा यांनी आफ्रिकेसाठी चांगली सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी झाली. बावुमा 35 धावा करुन बाद झाला. डुसेन 26 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

क्विंटन डी कॉकने 90 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. क्विंटन डी कॉक 106 चेंडूत 109 धावा करुन बाद झाला. डी कॉक बाद झाल्यानंतर मार्कराम आणि क्लासेनने डावाची धुरा सांभाळली आणि दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. एडन 56 धावा करुन बाद झाला.

हेन्रिचला केवळ 29 धावा करता आल्या. मार्कोने 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेवटच्या षटकात डेव्हिड मिलर क्लीन बोल्ड झाला.

पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची स्थिती खराब!

या पराभवानंतर कांगारु संघाला गुणतालिकेतही मोठा धक्का बसला आहे. 10 संघांच्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया नवव्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच पहिले दोन सामने मोठ्या फरकाने जिंकून आफ्रिकन संघ आता अव्वल स्थानी पोहोचला आहे.

पहिल्या सामन्यात आफ्रिकन संघाने श्रीलंकेचा 102 धावांनी पराभव केला होता. आता संघाने ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी पराभव करत शानदार विजयाची नोंद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT