Sophia Dunkley  Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: सोफिया डंकलीने रचला इतिहास, सर्वात जलद अर्धशतक करणारी ठरली...

Gujarat Giants: गुजराज जायंट्सची सलामीवीर सोफिया डंकलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे.

Manish Jadhav

WPL 2023: गुजराज जायंट्सची सलामीवीर सोफिया डंकलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे.

महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारी ती खेळाडू ठरली आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात सोफियाने अवघ्या 18 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यादरम्यान तिने 11 चेंडू सीमापार घालवले. डावाच्या 31व्या षटकात तिने लागोपाठ पाच चौकार लगावले.

दुसरीकडे, डंकलीने तिसऱ्या षटकातील लागोपाठ दोन चौकार मारले. मात्र, त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर मेघना बाद झाली. मेघना बाद झाल्यानंतर पुढच्या षटकात डंकलीने रेणुका सिंगच्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार ठोकला.

त्यानंतर, डंकलीने पाचव्या षटकात चार चौकार आणि एक षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. गुजरातने (Gujarat) प्रीती बोसविरुद्ध पाचव्या षटकात 23 धावा केल्या. सोफिया डंकलीचे या स्पर्धेतील हे पहिले अर्धशतक आहे.

तसेच, सोफिया डंकली 28 चेंडूत 65 धावा करुन बाद झाली. श्रेयंका पाटीलने डाव संपवला. तत्पूर्वी, गुजरात जायंट्सची कार्यवाहक कर्णधार स्नेह राणाने बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

गेल्या सामन्यात यूपी वॉरियर्सकडून पराभूत झालेल्या संघात गुजरातने कोणताही बदल केलेला नाही. आरसीबीचा मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) नऊ गडी राखून पराभव झाला, तर दिशा कसाटच्या जागी पून खेमनारचा समावेश करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

SCROLL FOR NEXT