Harry Brook  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: 'भविष्यातील सुपरस्टार...', ब्रुकने 55 चेंडूत शतक करताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

KKR vs SRH: सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज हॅरी ब्रुकने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Pranali Kodre

Harry Brook Century: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद संघाचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुकने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळताना शतकी खेळी केली. त्याच्या या शतकानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

24 वर्षीय ब्रुकने या सामन्यात 55 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचे हे आयपीएल कारकिर्दीतील पहिलेच शतक आहे. त्याने चालू हंगामातूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. सनरायझर्स हैदराबादने त्याला आयपीएल 2023 लिलावादरम्यान 13.25 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

दरम्यान, ब्रुकची बॅट पहिल्या तीन सामन्यांमध्ये फारशी तळपली नव्हती. त्याने गेल्या तीन सामन्यांमध्ये 13, 3, 13 अशा खेळी केल्या होत्या. पण त्याने त्याच्या चौथ्या आयपीएल सामन्यात खेळताना शतक झळकावले आहे. तसेच ब्रुकचे हे शतक आयपीएल 2023 हंगामातीलही पहिलेच शतक ठरले आहे.

त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेक मजेदार मीम्सही व्हायरल होत आहेत. तसेच अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही ब्रुक भविष्यातील सुपरस्टार ठरेल असे अंदाजही वर्तवले आहेत.

या सामन्यात सलामीवीर मयंक अगरवालची (9) विकेट लवकर विकेट गमावली होती. तसेच राहुल त्रिपाठीपण 9 धावांवर बाद झाला. पण नंतर ब्रुक आणि कर्णधार एडन मार्करमने हैदराबादचा डाव सांभाळताना 72 धावांची भागीदारी केली. मार्करमनेही 50 धावांची अर्धशतकी खेळी केली.

तसेच ब्रुकने अभिषेक शर्माबरोबर देखील 72 धावांची भागीदारी केली. अभिषेकने 32 धावांची खेळी केली. तसेच अखेरीस हेन्रिक क्लासेनने 6 चेंडूत नाबाद 16 धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादने 20 षटकात 4 बाद 228 धावा उभारल्या. कोलकाताकडून आंद्र रसेलने 3 विकेट्स घेतल्या. तसेच वरुण चक्रवर्तीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT