Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: फिफ्टी ठोकलेल्या 'हिटमॅन' ला चाहत्यांचा प्रश्न, 'पहले क्यों नहीं आए..'

रोहित शर्माने जखमी असतानाही फलंदाजी करत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

Pranali Kodre

IND vs BAN: भारताला बुधवारी बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अखेरच्या क्षणी 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पराभवानंतर भारताला 3 सामन्यांची मालिकाही गमवावी लागली आहे.

दरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माने जखमी असतानाही मैदानावर येत भारताला विजय मिळवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता. मात्र त्याला विजय मिळवून देताना आला नाही. त्यावर आता सोशल मीडियातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

बांगलादेशने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताला 272 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 65 धावांवरच 4 विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर श्रेयस अय्यर (82) आणि अक्षर पटेल (56) यांनी शतकी भागीदारी करत डाव सावरला होता. मात्र, या दोघांच्या विकेट्स गेल्यानंतर पुन्हा भारतीय फलंदाजी कोलमडली.

त्यामुळे अखेर डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झालेली असतानाही रोहित 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी त्याने त्याच्या अंगठ्याला बँडेजही बांधलेले होते. त्याने फलंदाजीला आल्यानंतर 3 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 51 धावांची खेळी केली. मात्र, भारताला अखेरच्या चेंडूवर 6 धावांची गरज होती. पण रोहितला या चेंडूवर एकही धाव करता आली नाही आणि भारतीय संघ पराभूत झाला.

त्यामुळे अखेर रोहितने दुखापतग्रस्त असतानाही एवढी झुंज दिल्याबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पण त्याचबरोबर सोशल मीडियावर अनेकांनी '#तुम_पहले_क्यों_नहीं_आए?' या हॅशटॅगसह देखील रोहितबद्दलच्या पोस्ट शेअर केल्या.

रोहितला जखमी अंगठ्यासह फलंदाजी करणे कठीण होते, त्याचमुळे तो लवकर फलंदाजीला आला नव्हता. मात्र, अखेर भारतीय संघ संकटात सापडल्याने त्याने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता.

रोहितची दुखापत

रोहितला याच सामन्यादरम्यान दुसऱ्याच षटकात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. या षटकात दुसऱ्या स्लीपमध्ये झेल घेण्याच्या प्रयत्नात त्याला दुखापत झाली होती आणि झेलही सुटला होता.

त्यावेळी त्याच्या हाताच्या अंगठ्याजवळून रक्त येत होते. त्यामुळे लगेचच त्याला उपचारासाठी मैदानातून बाहेर जावे लागले. नंतर बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली की त्याच्या अंगठ्याचे स्कॅन करण्यात आले.

आता रोहितने जरी दुसऱ्या वनडेत फलंदाजी केली असली, तरी तिसऱ्या वनडेत तो खेळताना दिसणार नाही. तो त्याच्या दुखापतीवरील उपाचारासाठी बांगलादेशवरून मुंबईत परतणार आहे, याबद्दल भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT