Sneh Rana X/BCCIWomen
क्रीडा

INDW vs AUSW: सुपरवूमन! हवेत सूर मारत स्नेह राणाने घेतला ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा अफलातून झेल, पाहा Video

Sneh Rana Catch: भारताच्या स्नेह राणाने वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडेत एक भन्नाट झेल घेतला होता.

Pranali Kodre

India vs Australia Women, 1st ODI Match at Wankhede Stadium, Sneh Rana Catch:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात गुरुवारी (28 डिसेंबर) वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात आला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. असे असले तरी या सामन्यात भारताची खेळाडू स्नेह राणाने घेतलेल्या झेलाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया महिला संघासमोर विजयासाठी 283 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एलिसा हेली फोबी लिचफिल्डबरोबर सलामीला फलंदाजीसाठी उतरली. मात्र ऑस्ट्रेलियाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला.

रेणूका सिंगने पहिल्याच षटकातील तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, ज्यावर हेलीने ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूने तिच्या बॅटची कड घेतली आणि तो मागे उडाला. तो चेंडू क्षेत्ररक्षकांना पार करेल असे वाटत असतानाच शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करत असलेल्या स्नेह राणाने हवेत झेप घेत चेंडू पकडला.

तिने घेतलेला अफलातून झेल पाहून सर्वच जण चकीत झाले होते. तिच्या या शानदार झेलामुळे हेलीला मात्र शुन्यावर माघारी परतावे लागले. स्नेह राणाने घेतलेल्या या झेलाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, या सामन्यात हेलीची विकेट पहिल्याच षटकात गेली असली, तरी नंतर फोबी लिचफिल्ड आणि एलिस पेरी दरम्यान, या सामन्यात हेलीची विकेट पहिल्याच षटकात गेली असली, तरी नंतर फोबी लिचफिल्ड आणि एलिस पेरी यांनी शतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा भक्कम स्थितीत उभे केले. या दोघींनीही अर्धशतकी खेळी केली.

त्यांची दुसऱ्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी पेरीला दीप्ती शर्माने बाद केल्याने तुटली. पेरीने 72 चेंडूत 75 धावांची खेळी केली. यात तिने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. ती बाद झाल्यानंतर फोबीला बेथ मुनीनेही चांगली साथ दिली. पण फोबीला 31 व्या षटकात स्नेह राणाने त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला.

मात्र, यानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव मूनी आणि ताहलिया मॅकग्राने सांभाळत संघाला 40 व्या षटकापर्यंतच जवळपास 250 धावांपर्यंत पोहचवले होते. मूनी 42 धावांवर बाद झाली, मात्र मॅकग्राने नाबाद 68 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला 47 व्या षटकात विजयपर्यंत पोहचवले.

भारताकडून गोलंदाजी करताना रेणूका सिंग, पुजा वस्त्राकर, स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने 50 षटकात 8 बाद 282 धावा केल्या होत्या. भारताकडून जेमिमाह रोड्रिग्सने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली. तसेच पुजा वस्त्राकरने 62 धावा केल्या, तर यास्तिका भाटीयाने 49 धावांची खेळी केली. अन्य कोणाला 25 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

ऑस्ट्रेलियाकडून ऍश्ले गार्डनर आणि जॉर्जिया वेरहॅम यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच डार्सी ब्राऊन, मेगन शट आणि ऍनाबेल सदरलँड्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT