Smriti Mandhana Dainik Gomantak
क्रीडा

Smriti Mandhana: T20 मध्ये स्मृतीची मोठी कामगिरी, रोहित-विराटच्या क्लबमध्ये सामील

Manish Jadhav

Smriti Mandhana Touched 3000 T20I Runs Landmark: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, मुंबई येथे खेळला जात आहे. या सामन्यात 2 धावा करत स्मृती मंदानाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या. ती आता T20I क्रिकेटमध्ये 3,000 धावा करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. तसेच, भारतीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी ती एकूण चौथी खेळाडू आहे.

सर्वात जलद 3000 धावा करणारी महिला खेळाडू

दरम्यान, स्मृतीने तिच्या 122 व्या टी-20 डावात 3,000 धावांचा टप्पा गाठला. हा टप्पा गाठणारी ती आता सर्वात वेगवान भारतीय क्रिकेटपटू बनली आहे. त्याचबरोबर अशी कामगिरी करणारी टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर अन्य भारतीय महिला खेळाडू आहे. तिने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 135 डावांत हा टप्पा गाठला होता. एकूणच, या फॉरमॅटमध्ये 3,000 धावा पूर्ण करणारी मंदाना ही सहावी महिला आहे. याआधी सुझी बेट्स, मेग लॅनिंग, स्टेफनी टेलर, सोफी डिव्हाईन आणि हरमनप्रीत कौर यांनी महिला क्रिकेटमध्ये हे स्थान मिळवले आहे.

रोहित-कोहलीच्या क्लबमध्ये सामील

स्मृतीने 3000 धावा पूर्ण करताच, तिने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. हा टप्पा गाठणारी ती पुरुष आणि महिलामध्ये चौथी क्रिकेटपटू आहे. भारताकडून खेळताना 3000 किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये मंदाना सामील झाली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माने याआधी ही कामगिरी केली आहे. या फॉरमॅटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नावावर 3000+ धावा आहेत. मार्टिन गुप्टिल, बाबर आझम, पॉल स्टर्लिंग आणि अॅरॉन फिंच हे उर्वरित फलंदाज आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT