MS Dhoni & Arijit Singh Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: अन् अरिजीत सिंगनं लाखो प्रेक्षकांसमोर थेट धोनीचे पायच धरले, चाहत्यांकडून होतय कौतुक

आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान अरिजीत सिंगने धोनीचे पाय धरल्याचे दिसले.

Pranali Kodre

Arijit Singh touches MS Dhoni's feet: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला.

या सामन्यापूर्वी आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा उद्घाटन सोहळा जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच मोठ्या उत्साहात पार पडला. याच सोहळ्यादरम्यान एक अशी घटना पाहायला मिळाली, ज्याने लाखो चाहत्यांचे मन जिंकले आहे.

या सोहळ्यात लोकप्रिय सेलिब्रेटी अरिजीत सिंग, रश्मिका मंदाना आणि तमन्ना भाटीया यांनी परफॉर्मन्स केले. त्यांच्या परफॉर्मन्सनंतर जेव्हा ते स्टेजवर आले होते, त्यावेळी या सोहळ्याचे निवेदन करणाऱ्या मंदीरा बेदी यांनी सीएसके आणि गुजरातच्या कर्णधारांनाही स्टेजवर बोलावले.

त्यामुळे सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी आणि गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या स्टेजवर आले. याचदरम्यान, अरिजीत सिंग धोनीच्या पाया पडताना दिसला. त्याचा धोनीच्या पाया पडत असतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच अनेक चाहत्यांकडून अरिजीतचे कौतुक होत आहे. तसेच अनेकांनी धोनीची क्रेज अतुलनीय असल्याचेही म्हटले.

या उद्घाटन सोहळ्यादरम्यान अरिजीत सिंगने अनेक गाणी गायली. तो गाणी गात असताना धोनीही ड्रेसिंग रुममधून त्याच्या गाण्यांना दाद देताना दिसला होता.

दरम्यान, धोनी हा फक्त भारतातीलच नाही, तर जगातील लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याने जगभरातून मिळून करोडो चाहते पाहायला मिळतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही त्याच्या लोकप्रियता कुठेही कमी झालेली दिसलेली नाही. केवळ अरिजीतच नाही, तर अनेक सेलिब्रेटी देखील धोनीचे चाहते आहेत.

धोनीने 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्याने त्यानंतरही आयपीएलमध्ये खेळले कायम केले आहे. पण सध्या सुरू असलेल्या आयपीएलचा 16 वा हंगाम हा त्याचा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा सध्या होत आहे. त्यामुळे आता धोनी खरंच या हंगामानंतर निवृत्ती घेणार की पुन्हा पुढच्यावर्षीही खेळताना दिसणार हे पाहावे लागणार आहे.

धोनीची कारकिर्द

धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच धोनीने आयपीएलमध्ये 235 सामने खेळले असून 39.31 च्या सरासरीने 4992 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने यष्टीमागे 171 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT