Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: आयपीएल फायनलमध्ये गिल रचणार इतिहास! कोहलीच्या 'विराट' रेकॉर्डपासून फक्त 2 धावा दूर

Shubman Gill IPL Records: आयपीएल 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना 28 मे (आज) रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

Manish Jadhav

Shubman Gill IPL Records: आयपीएल 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना 28 मे (आज) रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर हा शानदार सामना खेळवला जाणार आहे.

या मोठ्या सामन्यात घातक फॉर्ममध्ये असणारा गुजरातचा स्टार सलामीवीर शुभमन गिल एक मोठा विक्रम मोडीत काढू शकतो. तो नंबर 1 होण्यापासून फक्त 2 धावा दूर आहे.

गिल शानदार फॉर्ममध्ये आहे

गुजरात टायटन्ससाठी सलामी देताना शुभमन गिलने (Shubman Gill) मागील तीन सामन्यांमध्ये सलग शतके झळकावून आगामी काळात तो कोणत्या प्रकारचा खेळाडू बनणार आहे, हे जगाला दाखवून दिले.

गेल्या सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावून अनेक मोठे विक्रम एका चुटकीसरशी नष्ट केले.

आता तो चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर करु शकतो. विराट कोहलीला मागे टाकून त्याला नंबर-1 बनण्याची मोठी संधी आहे.

कोहलीचा 'विराट' विक्रम मोडीत निघणार!

दरम्यान, यंदाचा आयपीएल हंगाम विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खूपच शानदार राहिला. चालू हंगामातील त्याची फलंदाजी पाहून 2016 ची आठवण झाली. जिथे त्याने 4 ताबडतोब शतके ठोकताना 973 धावा केल्या होत्या. त्या मोसमात त्याने फिरकी गोलंदाजांविरुद्ध 364 धावा केल्या होत्या.

विराटचा हा विक्रम आता शुभमन गिलच्या निशाण्यावर आहे. 6 हंगामानंतर गिलकडे हा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे.

गिलने चालू मोसमात 363 धावा केल्या आहेत. जर त्याने आजच्या सामन्यात 2 धावा केल्या तर तो एका मोसमात फिरकी गोलंदाजांविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.

या विक्रमाची बरोबरीही करु शकतो

शुभमन गिलला विराट कोहलीच्या आणखी एका मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. गिलने चालू मोसमात आतापर्यंत 16 सामन्यात 851 धावा केल्या आहेत. तो आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

मागच्या तीन सामन्यांत सलग तीन शतके ठोकून त्याने ज्या प्रकारची लय दाखवली, तीच लय तो अंतिम सामन्यातही झळकावू शकतो.

असे झाल्यास तो विराट कोहलीच्या एका मोसमात सर्वाधिक 4 शतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी करेल. कोहलीशिवाय जोस बटलरनेही एका मोसमात 4 शतके झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT