Shubman Gill and Gurnoor Brar collide while taking a catch during the ENG vs IND 1st ODI Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND 1st ODI: कॅच तर घेतला, पण श्वास रोखला! लाईव्ह मॅचमध्ये शुभमन-गुरनूर जोरदार धडकले; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Shubman Gill Gurnoor Brar Collision Live Match: भारताचा कर्णधार शुभमन गिल याने झेल घेताना केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे त्याला गंभीर दुखापत होऊ शकली असती, पण सुदैवाने तो यातून थोडक्यात बचावला.

Manish Jadhav

Shubman Gill Gurnoor Brar Collision Live Match: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला धडाक्यात सुरुवात झाली. या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडची अवस्था इतकी बिकट झाली की त्यांनी अवघ्या 80 धावांवर आपले 5 प्रमुख फलंदाज गमावले.

भारतीय संघ या सामन्यावर आपली पकड मजबूत करत असतानाच, मैदानात एक अशी घटना घडली ज्याने काही क्षणांसाठी सर्वांचा श्वास रोखून धरला. भारताचा कर्णधार शुभमन गिल याने झेल घेताना केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे त्याला गंभीर दुखापत होऊ शकली असती, पण सुदैवाने तो यातून थोडक्यात बचावला.

हा थरारक प्रसंग इंग्लंडच्या डावातील 17व्या षटकात घडला. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर जॉस बटलरने हवेत शॉट मारला. चेंडू मिड-ऑफ आणि लाँग-ऑफच्यामध्ये हवेत खूप उंच गेला. हा झेल घेण्यासाठी शुभमन गिल आणि गुरनूर बरार हे दोघेही वेगवेगळ्या दिशेने वेगाने धावत आले. क्रिकेटमध्ये जेव्हा दोन खेळाडू एकाच झेलसाठी धावतात, तेव्हा एकमेकांना सावध करण्यासाठी मोठ्याने आवाज (कॉल) देणे गरजेचे असते. परंतु, या दोघांपैकी कोणीही आवाज दिला नाही आणि चेंडू पकडण्याच्या नादात दोघेही एकमेकांना जोरात धडकले.

गुरनूर बरारची धडक बसताच शुभमन गिल जमिनीवर पडला. सुदैवाने, या जोरदार धडकेनंतरही बरारच्या हातातून झेल सुटला नाही आणि बटलर बाद झाला. तसेच गिलला कोणतीही दुखापत झाली नाही, ज्यामुळे संघाने सुटकेचा श्वास सोडला.

सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडच्या बेन डकेटने गुरनूर बरारच्या एका षटकात 17 धावा कुटून भारतावर (India) दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. 13व्या षटकात गुरनूरने जेकब बेथल आणि बेन डकेट या दोन्ही सलामीवीरांना बाद करुन भारताला पहिले यश मिळवून दिले.

यानंतर 14व्या षटकात जसप्रीत बुमराहने हॅरी ब्रूकचा बळी घेतला. पाठोपाठ 17व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने बटलर आणि सॅम करनला बाद करुन इंग्लंडचे कंबरडे मोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT