Shubman Gill-Sara Tendulkar  Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill-Sara Tendulkar Relationship: ब्रेकअपनंतर शुभमन-सारा पुन्हा रिलेशनशिपमध्ये?

Shubman Gill Sara Tendulkar Relationship: टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल बांगलादेशविरुद्ध शानदार शतक झळकावल्यानंतर चर्चेत आहे.

Manish Jadhav

Shubman Gill Sara Tendulkar Relationship: टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल बांगलादेशविरुद्ध शानदार शतक झळकावल्यानंतर चर्चेत आहे. गिल त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो. सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरसोबतच्या कथित नात्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच, त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

रिपोर्ट्सनुसार, आता शुभमन आणि सारा यांचे नाते पुन्हा एकदा घट्ट झाले आहे. या कपलच्या नात्यात आता सर्व काही ठीक असल्याचं बोललं जात आहे. एवढेच नाही तर सारा तेंडुलकरने शुभमनची बहीण शाहनील गिललाही इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे.

जुने स्क्रीनशॉट व्हायरल झाले

सर्व अटकळांच्या दरम्यान, शुभमन आणि सारा यांच्यातील काही जुने स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यापैकी एकामध्ये, भारतीय क्रिकेटरच्या वाढदिवसाच्या लाईव्ह सत्रादरम्यान, साराने कमेंट केली - 'HBDDDDDDD', तर हार्दिक पांड्याने शुभमनची मजा घेण्यासाठी कमेंट केली. ज्यात लिहिलं होतं- त्यांच्या कडून तुमचे स्वागत आहे.

सारा अली खानबद्दलही अफवा

दरम्यान, शुभमन अभिनेत्री सारा अली खानला डेट करत असल्याचीही चर्चा रंगली होती. ही 'सारा' कोण याबाबत अनेक वेळा संभ्रम निर्माण होतो. रिपोर्ट्सनुसार, दोघे दिल्लीत काही वेळा एकत्र दिसले होते. सोनम बाजवाच्‍या चॅट शोमध्‍ये 'केदारनाथ'च्‍या वेळी तिला डेटींगबद्दलही विचारण्‍यात आले होते तेव्हा, तर तिने 'कदाचित, कदाचित नाही' असे सांगून ते टाळले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Accident: राज्यात रस्ते अपघातात वाढ, 2022 पासून आतापर्यंत 843 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती

Pakistan: 'सात पाऊले चल, मग गोळी मार...', पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगचा थरकाप, जोडप्याचा VIDEO व्हायरल!

Goa Assembly Live: अर्थसंकल्पीय भाषणात आमदार गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा!

3.50 लाख रुपये देऊन गोव्यात मिळवली पोस्टमनची नोकरी; 40 गोमंतकीयांना कमी करुन 50 महाराष्ट्रातील उमेदवारांची भरती - सरदेसाई

SCROLL FOR NEXT