Shubhaman Gill Dainik Gomantak
क्रीडा

शुभमन गिल जायबंदी; ईश्वरनच्या समावेशनाची शक्यता

सलामीचा फलंदाज शुभमन गिल (Shubhaman Gill) जखमी झाला असून तो संपूर्ण मालिकेला मुकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

इंग्लंड (England) दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाला (Team India) जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्यानंतर मोठा धक्का बसला आहे. सलामीचा फलंदाज शुभमन गिल (Shubhaman Gill) जखमी झाला असून तो संपूर्ण मालिकेला मुकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याची जागा भरुन काढण्यासाठी अभिमन्यू ईश्वरनची (Abhimanyu Ishwaran) संघामध्ये समावेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र संघव्यवस्थापनाने गिलच्या दुखापतीविषयी स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुध्दच्या मालिकेसाठी तो उपलब्ध असेल किंवा नाही यात एकवाक्यता दिसत नाही. शुभमन गिल संपूर्ण मालिकेसाठी मुकणार असल्याची शक्यता आहे. मालिकेसाठी एक महिना असताना संघ व्यवस्थापन एवढे स्पष्टपणे कसे काय बोलू शकते असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, शुभमन गिलच्या पोटऱ्याचे स्नायू दुखावले असतील किंवा स्नायूची दुखापत वाढली असले असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु ही दुखापत कधी झाली याची पूर्णत:हा कल्पना नाही, सध्या फिजिओ नितीन पटेल (Nitin Patel) आणि सराव प्रशिक्षक सोहम देसाई (Soham Desai) गिलच्या दुखापतीवर नजर ठेवून आहेत. गिलची मालिका खेळण्याची शक्यता कमी असल्यामुळे बीसीसीआने (BCCI) नवा पर्यायी खेळाडूचा विचार करण्यास सुरुवात केली आहे. संघात राखीव खेळाडू म्हणून असणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनच्या समावेशनाची शक्यता बोलून दाखवण्यात आहे

ऑस्ट्रेलियामधील (Australia) विजयी दौऱ्यात शुभमन गिलची कामगिरी लक्षवेधक झाली होती. मात्र जागतिक कसोटीतील अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या (New Zealand) गोलंदाजांचा सामना करताना त्याची धांदल उडाली होती. सध्या टीम इंडियामधील लोकेश राहुल (Lokesh Rahul) आणि मयांक अगरवाल (Mayank Agarwal) हे दोन सलामीचे खेळाडू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT