Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

ICC T20 Rankings: श्रेयस अय्यरचे बल्ले-बल्ले, विराट टॉप-10 मधून बाहेर !

आयसीसीसी टी20 (ICC T20) क्रमवारीत श्रेयस अय्यरला मोठा फायदा झाला आहे.

दैनिक गोमन्तक

आयसीसीसी टी20 (ICC T20) क्रमवारीत श्रेयस अय्यरला मोठा फायदा झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्याने शानदार कामगिरीच्या जोरावर 27 स्थानांची झेप घेतली आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आता T20 क्रमवारीत 18 व्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. दुसरीकडे मात्र टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली टॉप-10 रँकिंगमधून बाहेर पडला आहे. तो श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) मालिकेचा भाग नव्हता. त्यामुळे त्याचे नुकसान झाले आहे. तो 10 व्या क्रमांकावरुन 15 व्या क्रमांकावर गेला आहे. T20 मालिकेत भारताने श्रीलंकेचा 3-0 ने पराभव केला. याचा खेळाडूंच्या क्रमवारीला चांगला फायदा झाला आहे. श्रेयस अय्यरने या मालिकेत 174 च्या स्ट्राईक रेटने 204 धावा केल्या. (Shreyas Iyer Has A Big Advantage In The ICC T20 Rankings)

दुसरीकडे, भुवनेश्वर कुमारने गोलंदाजांमध्ये तीन अंकानी झेप घेतली आहे. तो आता 17 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत श्रीलंकेच्या पथुम निसांकाने 75 धावा केल्या होत्या. यामुळे तो सहा स्थानांनी वर येऊन नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) मोहम्मद वसीमने देखील T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रमवारीत पहिल्या 20 मध्ये पोहोचलेल्या खेळाडूंमध्ये होता. आयसीसी पुरुष T20 विश्वचषक पात्रता A च्या अंतिम सामन्यात आयर्लंडविरुद्ध नाबाद शतकाने त्याला 12 व्या स्थानावर पोहोचण्यास मदत केली. यूएईच्या एकूण फलंदाजामधील ही सर्वोत्तम क्रमवारी आहे. त्याच्या आधी शैमन अन्वर 2017 मध्ये 13 व्या स्थान गाठले होते.

तसेच, श्रीलंकेच्या लाहिरु कुमाराने प्रथमच पहिल्या 40 गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. यूएईचा गोलंदाज झहरु खान 17 स्थानांनी झेप घेत 42 व्या तर आयर्लंडचा जोश लिटलने 27 अंकानी झेप घेऊन संयुक्त 49 व्या स्थानावर पोहोचला आहे. रोहन मुस्तफा अष्टपैलू रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. फेब्रुवारी 2020 मधील पाचव्या क्रमांकाच्या त्याच्या सर्वोत्तम रँकिंगपेक्षा फक्त एक स्थानाने घसरण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LSG vs DC: स्टब्सची फटकेबाजी अन् प्रिन्सची खुन्नस! लखनऊ विरुद्ध दिल्ली सामन्यात हायहोल्टेज ड्रामा; 'हॉट टॉक'ने वेधलं लक्ष VIDEO

VIDEO: कोटींच्या फायटर जेटला लाखांच्या ड्रोननं छळलं! 'इराणी शाहेद'नं अमेरिकेच्या बाहुबली F-15 ला चारली धूळ; 'टार्गेट हिट'चा थरारक व्हिडिओ व्हायरल

Goa Crime: दुप्पट पैशांचे आमिष अंगलट आले, 16 वर्षीय तरुणाची फसवणूक; अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

164 वर्षांपूर्वीचे घनदाट जंगल, काकोड्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान; श्री संस्थान मारुतीगडावरील हनुमान मंदिर

Ramayna Teaser: प्रफुल्लित रुप, डोळ्यात तेज! 'रामायण'चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज, प्रभू रामांच्या रुपात रणबीर कपूरचा लूक व्हायरल; चाहते मंत्रमुग्ध VIDEO

SCROLL FOR NEXT