Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Shreyas Iyer MS Dhoni Toss Record: सामन्यात मैदानातील कामगिरीसोबतच भारतीय संघाचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर याने एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.

Manish Jadhav

Shreyas Iyer MS Dhoni Toss Record: भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे खेळल्या जात असलेल्या टी-20 सामन्यात विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरत पुन्हा एकदा नाणेफेक (टॉस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला हादरवत उत्कृष्ट सुरुवात करुन दिली. मात्र, या सामन्यात मैदानातील कामगिरीसोबतच भारतीय संघाचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर याने एक ऐतिहासिक कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सलग सर्वाधिक नाणेफेक जिंकण्याचा महान कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा 14 वर्षे जुना विक्रम श्रेयसने मोडीत काढला.

श्रेयसने आतापर्यंत भारतीय संघाचे 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून विशेष म्हणजे या सर्व 8 सामन्यांमध्ये त्याने नाणेफेक जिंकण्याचा पराक्रम केला. टी-20 फॉरमॅटमध्ये सलग आठ सामन्यांत नाणेफेक जिंकणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी हा महत्त्वपूर्ण विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता. धोनीने 2010 ते 2012 या कालावधीत सलग 7 टी-20 सामन्यांमध्ये टॉस जिंकला होता. दीर्घ कालावधीनंतर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) धोनीचा हा विक्रम मागे टाकत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नव्या अध्यायाची नोंद केली.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नाणेफेक जिंकण्याच्या बाबतीत दिग्गज कर्णधारांची कामगिरी नेहमीच चर्चेत राहिली आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 2019 मध्ये कर्णधार असताना सलग 6 टी-20 सामन्यांमध्ये टॉस जिंकला होता, मात्र त्याला धोनीचा विक्रम मोडता आला नव्हता. तर महेंद्रसिंग धोनीने या यादीत दुसऱ्यांदा स्थान मिळवताना 2007 मध्येही सलग 5 वेळा टॉस जिंकला होता. याशिवाय भारताला दुसरा टी-20 विश्वचषक जिंकून देणारा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा याने देखील 2020 ते 2022 दरम्यान सलग 5 टी-20 सामन्यांत टॉस जिंकण्याचा पराक्रम केला होता.

सध्याच्या हरारे येथील सामन्यात श्रेयस अय्यरच्या या 'लकी टॉस'मुळे भारतीय संघाला मोक्याच्या क्षणी गोलंदाजीची अनुकूल संधी मिळाली. मैदानातील अचूक रणनीती आणि नाणेफेकीतील या अद्भुत सातत्यामुळे श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून आपल्या कारकिर्दीची अत्यंत बहारदार सुरुवात केली असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT