Crocodile Kills soccer player Dainik Gomantak
क्रीडा

Crocodile Kills soccer player: धक्कादायक! धाडस बेतले जीवावर, मगरीच्या हल्ल्यात 29 वर्षीय फुटबॉलरचा मृत्यू

मगरीने केलेल्या हल्ल्यात 29 वर्षीय फुटबॉरला जीव गमवावा लागल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pranali Kodre

Crocodile Kills soccer player: क्रीडा विश्वातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोस्टा रिकामधील 29 वर्षीय फुटबॉलपटूला मगरीच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. जीजस अल्बर्टो लोपेज ऑर्टिझ असे या फुटबॉलपटूचे नाव आहे.

मार्सा या स्पेनिश आऊटलेटने याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, त्याचा मृत्यू बुडून झाला की मगरीच्या हल्ल्यात झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. ही घटना कोस्टा रिकाची राजधानी सॅन जोसपासून सुमारे 140 किमी अंतरावर असलेल्या गुआनाकास्ट प्रांतामधील सांताक्रूझ शहराजवळ घडली.

ही घटना कॅनस नदीत घडली. व्यायाम करत असताना ऑर्टिझने मगरींच्या अस्तित्वामुळे बंद असलेल्या मासेमारी पुलावरून ऑर्टिझने नदीत उडी मारली होती. यादरम्यान, त्याचे शरीर मगरीने तोंडात धरलेले असतानाचा विचलीत करणारा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मगर ऑर्टिझच्या शरीराचा ताबा सोडत नव्हती. तसेच त्याला घेऊन पाण्यात लपवण्यासाठी घेऊन जात होती. त्याचमुळे स्थानिक रेड क्रॉस दलाने मगरीला गोळी घातली. पोलिसांनी सांगितले की जर मगरीला गोळी घातली नसती, तर तिने ऑर्टिझचे शव खोल पाण्यात नेऊन लपवले असते आणि नंतर ते मिळाले नसते.

दरम्यान, ऑर्टिझ डेपोर्टिवो रिओ कॅनास संघाकडून खेळायचा. तो कोस्टा रिकन एसेन्सो लीगमध्येही खेळला होता. त्याच्या संघानेही फेसबुक पोस्टमधून त्याच्या निधनाची पुष्टी केली आहे.

त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की 'आम्ही आमचा खेळाडू जीजस लोपेझ ऑर्टिझ (छुचो) याच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करतो. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. आजचा दिवस सर्वांसाठीच खूप कठीण आहे. एक प्रशिक्षक, खेळाडू आणि एक कुटुंबशील व्यक्ती म्हणून तुझ्या क्रीडा प्रवासातील अनेक पैलूंमध्ये आम्ही तुझी आठवण ठेवू. तू नेहमी आमच्या हृदयात राहशील छुचो.'

ऑर्टिझच्या मागे त्याची 8 आणि 3 वर्षांची दोन मुले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT