गोव्याची (Goa) मदार अनुभवी खेळाडूंवर Dainik Gomantak
क्रीडा

आगामी महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोवा संघाची कमान शिखा पांडेकडे

गोव्याची (Goa) मदार अनुभवी खेळाडूंवर, ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून शिखा (Shikha Pandey) गोव्याच्या संघात दाखल झाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत (Women's ODI cricket tournament) गोव्याची (Goa) मदार अनुभवी खेळाडूंवर असेल. स्पर्धेसाठी वीस सदस्यीय संघ निवडण्यात आला असून कसोटी अष्टपैलू शिखा पांडे (Shikha Pandey) हिच्याकडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले.

ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून शिखा गोव्याच्या संघात दाखल झाली आहे. विशाखापट्टणमला जाणाऱ्या संघात सुनंदा येत्रेकर, रूपाली चव्हाण, विनवी गुरव, संजुला नाईक, तेजस्विनी दुर्गड, निकिता मळीक, पूर्वजा वेर्लेकर या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय १९ वर्षांखालील स्पर्धेत प्रभावी कामगिरी केलेल्या इब्तिसाम शेख, सावली कोळंबकर, मिताली गौंडर, तनया नाईक खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षण-क्रिकेट कार्यवाही संचालक प्रकाश मयेकर, महिला क्रिकेट प्रतिनिधी संगीता मांजरेकर, निवड समिती अध्यक्ष डेझी डिसोझा, सदस्य कृत्तिका नाईक, लिझेट वाझ, संघाचे मुख्य प्रशिक्षक अनंत तांबवेकर यांची बैठक मंगळवारी झाली, त्यावेळी स्पर्धेसाठी संघ निवडण्यात आला.

मोहीम 31 पासून

गोव्याचे सामने आंध्र प्रदेशमधील विखाखापट्टणम आणि विझियानगरम येथे खेळले जातील. विलगीकरण प्रक्रिया 23 ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर सामने 31 ऑक्टोबरपासून सुरू होतील. एलिट ‘ड’ गटात गोव्यासह विदर्भ, हरयाणा, मध्यप्रदेश, गुजरात व मिझोराम हे संघ आहेत.

गोव्याचा महिला संघ

शिखा पांडे (कर्णधार), विनवी गुरव, तेजस्विनी दुर्गड, संजुला नाईक, इब्तिसाम शेख, सुनंदा येत्रेकर, निकिता मळीक, रूपाली चव्हाण, सावली कोळंबकर, श्रेया परब, सोनाली गौंडर, पूर्वा भाईडकर, पूर्वजा वेर्लेकर, दीक्षा आमोणकर, दिव्या नाईक, सिया फळदेसाई, मंजुश्री भगत, सेजल सातार्डेकर, मिताली गौंडर, तनया नाईक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

MP Liquor Death: मध्य प्रदेशात विषारी दारूचा हाहाकार! 9 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

Tarun Tejpal: तरुण तेजपालच्या शिक्षावाढीच्या याचिकेला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

SCROLL FOR NEXT