Harbhajan Singh  dainik gomantak
क्रीडा

Team India: सामान गायब झाल्याने हा खेळाडू भडकला, हरभजनला मागावी लागली माफी!

Indian Cricket Team: टीम इंडियाच्या एका खेळाडूला मुंबई विमानतळावर अडचणींचा सामना करावा लागला.

दैनिक गोमन्तक

Harbhajan Singh Viral Tweet: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडियाच्या एका खेळाडूला मुंबई विमानतळावर अडचणींचा सामना करावा लागला. मालिकेतील शेवटचा सामना खेळून हा खेळाडू दिल्लीहून मुंबईला परतत असताना मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-2 वरुन या खेळाडूची किट बॅग गायब झाली. यानंतर या खेळाडूने ट्विट करुन मदत मागितली. टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने त्याच्या ट्विटला उत्तर देताना माफी मागितली, मात्र हरभजन सिंगने असे का केले ते आम्ही तुम्हाला सांगू.

या खेळाडूचे सामान गायब झाले

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा (Team India) भाग असलेल्या शार्दुल ठाकूरचे सामान मुंबई विमानतळावरुन गायब झाले. यावर शार्दुलने ट्विट करत म्हटले की, 'एअर इंडिया मला लगेज बेल्टवर मदत करण्यासाठी कोणाला पाठवू शकते का? माझी किट बॅग वेळेवर न मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. तुमचा एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही.'

यावर हरभजन सिंगने माफी मागितली

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) हा यापूर्वी एअर इंडियाचा (Air India) कर्मचारी होता, त्यामुळे त्याने ट्विट करुन शार्दुल ठाकूरची माफी मागितली. या ट्विटला उत्तर देताना हरभजन सिंगने लिहिले की, 'शार्दुल, तू काळजी करु नकोस. तुला तुझे सामान मिळेल. आमचे कर्मचारी तिथे पोहोचतील. त्रास झाल्याबद्दल क्षमस्व.' यावर शार्दुल ठाकूरनेही (Shardul Thakur) याला उत्तर देताना लिहिले की, 'भज्जी पाजी तुमच्यावर खूप प्रेम आहे, मला दुसऱ्या विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. माझे सामान मिळाले. धन्यवाद.'

T20 विश्वचषकासाठी लवकरच रवाना होणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपक चहरच्या जागी शार्दुल ठाकूर ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. अलीकडेच त्याने शानदार परफॉर्मन्स दिला होता. शार्दुल ठाकूरने टीम इंडियासाठी आतापर्यंत 25 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 33 विकेट्स घेतल्या आहेत. शार्दुल ठाकूर गेल्या T20 विश्वचषकातही टीम इंडियाचा भाग होता, तर यावेळी तो स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात सामील होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT