Shaheen Afridi - Shahid Afridi Dainik Gomantak
क्रीडा

Shahid Afridi: 'मुली या फुलासारख्या...' लेकीचं शाहीनशी लगीन लावल्यानंतर लालाची भावूक पोस्ट

शाहिद आफ्रिदीने त्याच्या मुलीचा शाहीन आफ्रिदीशी निकाह झाल्यानंतर भावनिक पोस्ट केली आहे.

Pranali Kodre

Shahid Afridi: पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीची सर्वात मोठी मुलगी अंशा हिचा निकाह पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीशी झाला आहे. यानंतर शाहिद आफ्रिदीने मुलीसाठी केलेल्या भावूक ट्वीटची चर्चा होत आहे.

शाहीन आणि अंशा यांचा निकाह 3 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडला. हा सोहळा कराचीमध्ये झाला. त्यांच्या निकाहनंतर 4 फेब्रुवारीला शाहिदने ट्वीट करत अंशा आणि शाहीनला शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहीदने ट्वीट केले आहे की 'मुली या तुमच्या बागेतील एखाद्या सुंदर फुलासारख्या असतात, कारण मोठ्या आशीर्वादाने फुलतात. मुली या अशा असतात, ज्यांच्याबरोबर तुम्ही तुमच्या हृदयापासून हसता, स्वप्न बघता आणि त्यांच्यावर प्रेम करता. पालक म्हणून मी माझ्या मुलीला निकाहमध्ये शाहीनकडे सोपवले आहे. त्या दोघांनाही शुभेच्छा.' शाहिदच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

शाहिन आणि अंशा यांच्या निकाह सोहळ्यासाठी अनेक आजी-माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, सर्फराज खान, शादाब खान, नसीम शाह अशा अनेक क्रिकेटपटूंचा समावेश होता.

त्यांच्या निकाहचे फोटो आणि व्हिडिओ शाहीन पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत असलेल्या लाहोर कलंदर्स संघाने शेअर केले आहेत. दरम्यान शाहीन १३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पीएसएल 2023 स्पर्धेत लाहोर कलंदर्सकडून खेळताना दिसणार आहे.

शाहीन आणि अंशा यांच्या नात्याची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चाही बऱ्याच महिन्यांपासून होत होत्या. अखेर त्यांचा निकाह झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

शाहीन हा पाकिस्तान क्रिकेट संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आत्तापर्यंत 25 कसोटी सामने खेळले असून 99 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने 11 वेळा एका डावात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 32 वनडे सामने खेळले असून 62 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 47 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 58 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT