Pranali Kodre
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीचा जावई झाला आहे.
शाहीनचा निकाह ३ फेब्रुवारी २०२३ रोजी शाहीद आफ्रिदीची सर्वात मोठी मुलगी अंशा हिच्याशी झाला.
शाहीन आणि अंशा यांचा निकाह सोहळा कराचीमध्ये पार पडला.
शाहीन आणि अंशा यांचा निकाह ठरल्याची चर्चा गेल्या वर्षापासून सुरू होती. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
त्यांच्या निकाहचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
त्यांच्या निकाहसाठी शाहीनचे संघसहकारी बाबर आझम, सर्फराज खान, शादाब खान, नसीम शाहसारखे अनेक खेळाडूही उपस्थित होते.
रिपोर्ट्सनुसार अंशा आफ्रिदी युकेमध्ये वैद्यकिय शिक्षण घेत होती.
शाहीन आता 13 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग 2023 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.