Shahid Afridi
Shahid Afridi  Dainik Gomantak
क्रीडा

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीला मिळाली मोठी जबाबदारी, बनला मुख्य सिलेक्टर्स

दैनिक गोमन्तक

Shahid Afridi, Chief Selector PCB: पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला पीसीबीमध्ये नवी जबाबदारी मिळाली आहे. मध्यंतरीच त्याला मुख्य सिलेक्टर्स बनवण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मागील निवड समिती हटवली आहे. मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आफ्रिदी धन्यवाद म्हणाला

मुख्य सिलेक्टर्स झाल्यानंतर शाहिद आफ्रिदी म्हणाला की, 'पीसीबीच्या व्यवस्थापन समितीने ही जबाबदारी सोपवल्याचा मला अभिमान आहे. ही जबाबदारी माझ्या क्षमतेनुसार पार पाडण्यासाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही. आपल्याला विजयाच्या मार्गावर परत जाण्याची गरज आहे.'

वसीम यांच्या जागी जबाबदारी मिळाली

मोहम्मद वसीम यांच्या जागी 42 वर्षीय शाहिद आफ्रिदीला मुख्य सिलेक्टर्स बनवण्यात आले आहे. पीसीबी व्यवस्थापनाने मोठे बदल करताना मागील निवड समिती हटवली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानच्या पराभवानंतरच रमीझ राजा यांना पीसीबीच्या प्रमुख पदावरुन हटवण्यात आले. त्यांच्या जागी नजम सेठी यांची नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. नजम यांनी यापूर्वीही उच्चपदे भूषवली आहेत.

शाहिद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

आफ्रिदीने 1996 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो 22 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याने आपल्या कारकिर्दीत 27 कसोटी, 398 वनडे आणि 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यादरम्यान त्याने कसोटीत 1716 धावा, एकदिवसीय सामन्यात 8064 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1416 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 11 शतके आणि 51 अर्धशतके आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT