Shaheen Shah Afridi Dainik Gomantak
क्रीडा

Shahid Afridi: करा लगीनघाई! PAK टीमचा 'हा' खेळाडू आफ्रिदीच्या मुलीशी करणार लग्न

Shaheen Shah Afridi Marriage: पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

दैनिक गोमन्तक

Shaheen Shah Afridi Marriage: पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. शाहीन आफ्रिदीचा विवाह माजी स्टार क्रिकेटर शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा आफ्रिदीशी होणार आहे. या दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. अंशा ही आफ्रिदीची मोठी मुलगी आहे.

दरम्यान, एक्सप्रेस न्यूजशी बोलताना शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) सांगितले होते की, 'अंशा आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी लग्न करणार आहेत. हा सोहळा कराचीमध्ये होणार असून रिसेप्शनची तारीख अद्याप ठरलेली नाही.'

तसेच, शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानच्या सर्व फॉरमॅटमध्ये अतिशय महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने पाकिस्तानसाठी (Pakistan) आतापर्यंत 25 कसोटी, 32 एकदिवसीय आणि 47 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 99, एकदिवसीय सामन्यात 62 आणि टी-20 मध्ये 58 बळी आहेत. शाहीन शाह आफ्रिदीशिवाय पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हरिस रौफही विवाहबंधनात अडकणार आहे.

दुसरीकडे, हारिस रौफ या महिन्याच्या 26 तारखेला त्याच्या वर्ग मैत्रिणीशी लग्न करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवल्यास हरिसच्या घरी लग्नाच्या (Marriage) विधी सुरु झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: फातोर्ड्यात विरोधकांचा 'एकवट'! विरोधकांचे संघटितपणाचे प्रदर्शन; कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजीपीचे नेते एकत्र

Horoscope: सावधान! प्रेम जीवनात मोठे संकट! वृषभ-मकरसह 'या' 4 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

Goa Pollution: नरकासुराच्या नावावर पणजीत धुमाकूळ, वाहनचालकांची धूम; ध्वनी प्रदूषणामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Porvorim Flyover Meeting: परवरी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचो घेतलो नियाळ - रोहन खंवटे

IND vs AUS 2nd ODI: रोहित, कोहलीकडून 'विराट' खेळीची अपेक्षा! अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारी पाहा

SCROLL FOR NEXT