Shaheen Afridi 10 lakh fine Dainik Gomantak
क्रीडा

पाकड्यांच चाललंय काय? शाहीन आफ्रिदीनं सिकंदर रझाला गुपचूप हॉटेलमध्ये नेलं; रात्री 2 तास दोघांमध्ये... बोर्डानं ठोठावला 10 लाखांचा दंड

Shaheen Afridi 10 lakh fine: पाकिस्तान सुपर लीग (PSL) सध्या खेळापेक्षा मैदानाबाहेरील वादांमुळेच जास्त चर्चेत आहे.

Sameer Amunekar

पाकिस्तान सुपर लीग (PSL) सध्या खेळापेक्षा मैदानाबाहेरील वादांमुळेच जास्त चर्चेत आहे. लाहोर कलंदरचा कर्णधार आणि पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्यावर शिस्तभंगाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. हॉटेलमधील कडक सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहीनला १० लाख पाकिस्तानी रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. या घटनेत झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा याचेही नाव समोर आले असून, या प्रकरणामुळे पीएसएलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नियम तोडून बाहेरील व्यक्तींना हॉटेलमध्ये प्रवेश

ही घटना २८ मार्चच्या मध्यरात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझा यांनी प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता काही बाहेरील व्यक्तींना टीम हॉटेलमध्ये प्रवेश दिला. यामध्ये सिकंदर रझाचे काही मित्र आणि नातेवाईकांचा समावेश होता.

हॉटेलमध्ये प्रवेशासाठी रीतसर परवानगी मागण्यात आली होती, परंतु सुरक्षा कारणास्तव ती नाकारण्यात आली होती. तरीही, नियमांची पायमल्ली करत या दोघांनी आपल्या पाहुण्यांना आत नेले. लाहोर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत पीएसएल अध्यक्षांना पत्र लिहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

दोन तास चालली गुपचूप भेट

संबंधित पाहुणे रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेलच्या आत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. सुमारे दोन तास ही भेट सुरू होती, तर दुसरीकडे सिकंदर रझाने आपण केवळ ४० मिनिटेच सोबत होतो, असा बचाव केला आहे. पीएसएलसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळाडूंच्या सुरक्षेसाठी 'बायो-बबल' आणि कडक प्रोटोकॉल पाळले जातात.

सिकंदर रझाने स्वीकारली जबाबदारी

या वादानंतर सिकंदर रझाने घडल्या प्रकाराची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. मात्र, संघाचा कर्णधार म्हणून शाहीन आफ्रिदीने अशा बेजबाबदार कृत्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल लाहोर कलंदर संघाने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली.

संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, खेळाडू कितीही मोठा असला तरी शिस्त आणि सुरक्षा नियमांशी तडजोड केली जाणार नाही. दरम्यान, लाहोर कलंदरने या घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न करत ही बाब फुगवून सांगितली जात असल्याचे म्हटले आहे, तरीही भविष्यात असे घडू नये म्हणून सर्व खेळाडूंना ताकीद देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT