क्रीडा

Police Cup Football: ‘साळगावकर’ला पेनल्टींवर नमवून सेझा अकादमी अंतिम फेरीत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सेझा फुटबॉल अकादमीने जबरदस्त जिगर प्रदर्शित करताना 18व्या गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेची (Police Cup Football) अंतिम फेरी गाठली. अटीतटीच्या लढतीत त्यांनी साळगावकर एफसीला पेनल्टी शूटआऊटवर 10-9 असे हरविले. रंगतदार सामना सोमवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

निर्धारित वेळेत सेझा अकादमीचे दोन्ही गोल करणारा महंमद फाहीज याची कामगिरी लक्षणीय ठरली. तोच सामन्याचा मानकरी ठरला. त्याने भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटास सेझा अकादमीस 2-2 अशी गोलबरोबरी साधून दिली. त्यामुळे निकालासाठी पेनल्टी फटक्यांचा आधार घ्यावा लागला. त्यापूर्वी शुभम शिरवईकर व सौरभ पाटील यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे साळगावकर एफसीपाशी 2-1 अशी आघाडी होती.

पूर्वार्धात सेझा आघाडीवर

सामन्याच्या 13व्या मिनिटास सेझा अकादमीने आघाडी घेतली. यावेळी फाहीज याने मैदानाच्या मध्यक्षेत्रातून धाव घेत ॲस्टन रॉड्रिग्जच्या असिस्टवर संघाचे गोलखाते उघडले. तिसाव्या मिनिटास त्यांच्या कुणाल साळगावकरचे हेडिंग अगदी थोडक्यात हुकले होते. विश्रांतीला सेझा अकादमी संघ 1-0 असा आघाडीवर होता. 47व्या मिनिटास साळगावकरच्या शुभम शिरवईकर याने संघाला 1-1 अशी गोलबरोबरी साधून दिली. त्याने सॅम्युएल कॉस्ताच्या असिस्टवर चेंडूला अचूक दिशा दाखविली.

भरपाई वेळेत गोल

सामन्याच्या 79व्या मिनिटास साळगावकर संघाने सेटपिसेसवर 2-1 अशी आघाडी घेतली. सिद्धांत कुंडईकरच्या धारदार कॉर्नर फटक्यावर सौरभ पाटीलचे हेडिंग अचूक ठरले. 91व्या मिनिटास साळगावकरची आघाडी भेदली गेली. फ्रँकी ऑलिव्हेराच्या असिस्टवर सेझा अकादमीच्या फाहीज याने प्रतिस्पर्धी गोलरक्षक जेसन डिमेलो याला चकवा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री माविन, बाबूश यांना दिलासा, 'त्‍या' बहुचर्चित प्रकरणांना आव्‍हान न देण्‍याचा पोलिसांचा निर्णय

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

SCROLL FOR NEXT