Colin Montgomerie Marriage | Golf Legend Married Again
Colin Montgomerie Marriage | Golf Legend Married Again Dainik Gomantak
क्रीडा

Golf Legend Married Again: वयाच्या 59 व्या वर्षी बाशिंग बांधून पठ्ठ्या तयार! 'हा' दिग्गज खेळाडू तिसऱ्यांदा बनणार नवरदेव

दैनिक गोमन्तक

Colin Montgomerie Marriage: गोल्फ जगतातील दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेल्या कॉलिन मॉन्टगोमेरी यांनी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महान स्कॉटिश गोल्फरने वयाच्या 59 व्या वर्षी तिसऱ्या लग्नाची घोषणा केली. सोशल मीडियावर एक फोटो टाकून त्यांनी ही माहिती दिली. (Golf Legend Married Again)

दरम्यान, युरोपियन टूर ऑर्डर ऑफ मेरिट टूर्नामेंट 8 वेळा जिंकणाऱ्या कॉलिन माँटगोमेरी यांनी स्वतःची मॅनेजर सारा केसीला आपला जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सारा कॉलिन यांची स्पोर्ट्स मॅनेजर राहीली आहे.

दोघेही जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये (Relationship) होते. आता इन्स्टाग्रामवर (Instagram) सारासोबतचा फोटो पोस्ट करत कॉलिन यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, कॉलिन यांनी फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, जस्ट द परफेक्ट डे.

2017 मध्ये दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला

कॉलिन यांच्या पोस्टवर त्यांचे अभिनंदन करणाऱ्यांचा ओघ सुरु झाला आहे. 2007 मध्ये कॉलिन यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.

त्याचबरोबर त्यांचे दुसरेही लग्न फार काळ टिकले नाही आणि 2017 मध्ये त्यांनी दुसऱ्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. आता तब्बल 6 वर्षांनंतर कॉलिन तिसऱ्यांदा लग्न करण्यास तयार झाले आहेत.

कॉलिन यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड

कॉलिन यांची गणना जगातील सर्वोत्तम गोल्फरमध्ये केली जाते. स्कॉटिश लीजेंडकडे विक्रमी आठ युरोपियन टूर ऑर्डर ऑफ मेरिट किताब आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 1993 ते 1999 या कालावधीत त्यांनी यापैकी 7 जेतेपद पटकावले.

2013 मध्ये त्यांचा वर्ल्ड गोल्फ हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर कॉलिन चॅम्पियन्स टूरमध्ये सामील झाले. 2014 मध्ये त्यांनी पहिली मेजर चॅम्पियनशिप जिंकली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT