इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यंदाचा हंगाम पूर्णकरण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) उत्सुक आहे. आयपीएल दुसऱ्या टप्प्यासाठी भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील कसोटी मालिकेला कात्री लावण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. याबाबत बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) यांच्यात चर्चा सुरु आहे.(Scissors in the England Test series against India for the rest of the APL season?)
आयपीएल यंदाचा हंगाम सुरु असताना भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बीसीसीआयला आयपीएलचे राहिलेले 31 सामने स्थगित करावे लागले. हे सामने आता सप्टेंबरमध्ये खेळविण्यात येणार आहेत. त्या आधी 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर याकालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामने खेळविण्यात येणार आहेत. परंतु या मालिकेतील सामने कमी करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. याबाबत त्यांची इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी चर्चा सुरु आहे. आयपीएलची प्रक्षेपण वाहिनी स्टार स्पोर्टस् (Star Sports) ने देखील याला सहमती दर्शवली आहे. आयपीएल सामन्यांमधून इंग्लंड क्रिकेट बोर्डाला फायदा होऊ शकतो, यामुळे त्यांच्याकडून देखील याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.