Umran Malik  Dainik Gomantak
क्रीडा

...तर उमरान मलिक भारतीय संघात दीर्घकाळ टिकेल : सौरव गांगुली

आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे : सौरव गांगुली

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आयपीएल 2022 मध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या या युवा गोलंदाजाने चालू मोसमात जबरदस्त गोलंदाजी करत 14 डावात 22 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने अंतिम फेरीत पोहोचलेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध एका डावात पाच विकेट घेतल्या.

त्याच्या कामगिरीचे बक्षीस म्हणून, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी T20I मालिकेसाठी निवडलेल्या 18 जणांच्या भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी उमरानचे कौतुक केले आहे आणि त्याच्या कारकिर्दीबद्दल आपले मतही दिले आहे. गांगुलीने स्पष्टपणे सांगितले की उमरानने त्याचा फिटनेस आणि फॉर्म कायम ठेवला तर तो अधिक काळ खेळेल.

"त्याचे भविष्य त्याच्या हातात आहे. जर त्याने तंदुरुस्त राहून त्याच गतीने गोलंदाजी करत राहिल्यास तो येथे दीर्घकाळ टिकेल," असे गांगुली म्हणाला. उमरान व्यतिरिक्त गांगुलीने इतर युवा खेळाडूंचेही कौतुक केले. तो म्हणाला, "आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. टिळकने मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली आहे, राहुल (त्रिपाठी) सनरायझर्स हैदराबाद आणि तेवतिया यांनी गुजरात टायटन्ससाठी चांगली कामगिरी केली आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT