Ranji Cricket dainikgomantak
क्रीडा

Ranji Cricket : शतकवीर चिराग, जॅक्सनमुळे सौराष्ट्र सुस्थितीत

Ranji Cricket : गोव्याविरुद्ध पहिल्या दिवसाअखेर सौराष्ट्राचे ७ बाद ३४३ धावा

दैनिक गोमन्तक

पणजी : चिराग जानी याचे शतक, तसेच शतकाच्या वाटेवर असलेला शेल्डन जॅक्सन यांच्या प्रभावी फलंदाजीच्या बळावर रणजी करंडक क्रिकेट सामन्यात गतविजेत्या सौराष्ट्रने सुस्थिती गाठली. गोव्याविरुद्धच्या एलिट ड गट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर गुरुवारी त्यांनी ७ बाद ३४३ धावा केल्या. सामना मोटेरा-अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी (Narendra Modi) क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. (Saurashtra scored 343 runs for the loss of 7 wickets At the end of the first day)

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सहावे शतक केलेल्या ३२ वर्षीय चिराग याने १४० धावा केल्या. त्याने १९० धावांच्या खेळीत २२ चौकार व २ षटकार मारले. चिरागने जॅक्सन याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली. नंतर सौराष्ट्रने (Saurashtra) तीनशे धावा होण्यापूर्वी सात विकेट गमावल्या, पण दिवसअखेर जॅक्सनने धर्मेंद्रसिंह जडेजा याच्यासमवेत आठव्या विकेटसाठी ४० धावांची अभेद्य भागीदारी करून संघाचा डाव लांबविला. ३५ वर्षीय जॅक्सन प्रथम श्रेणी क्रिकेटमधील विसाव्या शतकापासून चार धावा दूर आहे. त्याने ११९ चेंडूंतील आक्रमक खेळीत सहा चौकार व पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ९६ धावा केल्या आहेत, तर जडेजा २३ धावांवर खेळत आहे.

गोव्याने मुंबईविरुद्ध (Mumbai) पराभूत झालेल्या संघात दोन बदल केले. दोन लढतीत ११.७५च्या सरासरीने फक्त ४७ धावा केलेल्या सलामीच्या सुमीरन आमोणकरची जागा अपेक्षेनुसार आदित्य कौशिक याने घेतली, तर अमूल्य पांड्रेकर याच्या जागी फिरकी गोलंदाज मलिकसाब सिरूरला रणजी क्रिकेटमध्ये (cricket) पदार्पणाची संधी लाभली.

चिरागची शानदार फलंदाजी

ओडिशाविरुद्ध मागील लढतीत द्विशतकी (२३५) खेळी केलेल्या चिरागने गुरुवारी तोच फॉर्म कायम राखला. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा सौराष्ट्रचा निर्णय सार्थ ठरला. स्नेल पटेल याला श्रीकांत वाघ याने शून्यावर पायचीत केल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील चिरागने हार्विक देसाई याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. नंतर तिसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्यासह ५३ धावांची भर टाकली. मात्र भारतीय कसोटी संघातील स्थान गमावलेल्या पुजारा याला सूर गवसला नाही. वैयक्तिक २८ धावांवर त्याला सुयश प्रभुदेसाईने पायचीत बाद केले. नंतर चिरागने जॅक्सनसह दमदार फलंदाजी करत गोव्याच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. सुयशनेच अमोघ देसाईकरवी चिरागला झेलबाद करून गोव्यासमोरील मोठा अडसर दूर केला.

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र, पहिला डाव : ८५ षटकांत ७ बाद ३४३ (हार्विक देसाई १४, स्नेल पटेल ०, चिराग जानी १४०, चेतेश्वर पुजारा २८, शेल्डन जॅक्सन नाबाद ९६, अर्पित वसवदा १२, प्रेरक मांकड २८, पार्थ भूत ०, धर्मेंद्रसिंह जडेजा नाबाद २३, लक्षय गर्ग १९-४-७४-२, श्रीकांत वाघ ७-२-३४-१, शुभम रांजणे १४-४-३०-१, अमित यादव १४-०-७२-०, सुयश प्रभुदेसाई ९-२-३६-२, दर्शन मिसाळ १६-२-६९-१, मलिकसाब सिरूर ६-०-२८-०)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT