Saudi Arabia Beats Argentina Dainik Gomantak
क्रीडा

Saudi Arabia Beats Argentina: मेस्सीच्या अर्जेंटिनाला सौदी अरेबियाचा 'धक्का'

2-1 गोलफरकाने मात; मेस्सीने नोंदवला वर्ल्डकपमधील सातवा गोल

Akshay Nirmale

Saudi Arabia Beats Argentina: फिफा वर्ल्डकपमध्ये तिसऱ्या दिवशी मंगळवारी ग्रुप सी मधील अर्जेंटिना विरूद्ध सौदी अरेबिया सामना अत्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात फर्स्ट हाफपर्यंत अर्जेंटनाने 1-0 अशी आघाडी घेतली होती. तथापि, दुसऱ्या हाफमध्ये सौदीने (Saudi Arabia) गेम चेंज करत आक्रमक धोरण स्विकारले. सौदीने त्यानंतर दोन गोल नोंदवले. निर्धारीत वेळ आणि जादा वेळेत या दोन गोलची परतफेड अर्जेंटिनाला (Argentina) करता आली नाही. सौदीचा हा विजय स्टार फुटबॉलपटू मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला धक्का मानला जात आहे.

(FIFA Football World Cup 2022)

मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी घेतलेल्या अर्जेंटिनाला दुसऱ्या हाफमध्ये सौदीने चांगलेच झुंजविले. सौदीच्या सालेह अलशेहरी यांनी 48 व्या मिनिटाला गोल नोंदवला आणि सौदीला गोलबरोबरी साधून दिली. त्यानंतर सालेम अलदौसरी याने 53 व्या मिनिटाला गोल नोंदवत अर्जेंटिनावर एक गोलची आघाडी घेतती. त्यानंतर सामना संपेपर्यंत अर्जेंटिनाला या गोलची परतफेड करता आली नाही. त्यामुळे स्पर्धेती पहिल्याच सामन्यात या विश्वचषकाचा दावेदान मानल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाला धक्का बसला आहे.

या सामन्यात सर्वांच्या नजरा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीवर होत्या. अपेक्षेप्रमाणे सामन्याच्या 10 व्याच मिनिटाला मेस्सीने अर्जेंटिनासाठी पहिला गोल नोंदवला. त्यामुळे या सामन्यात अर्जेंटिनाने मध्यंतरापर्यंत सौदी अरेबियावर 1-0 अशी आघाडी घेतली होती. सौदीच्या अब्दुल्लाहमिद याने निकोस ओटामेंडी याचा टीशर्ट पकडल्याने रेफ्रींनी अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली. त्यावर मेस्सीने कोणतीची चूक न करता फुटबॉल गोलजाळ्यात पोहचवला. हा मेस्सीचा वर्ल्डकपमधील 7 वा गोल आहे.

अर्जेंटिनाच्या लोटारो मार्टिनेझ यांना दुसरा गोल नोंदवला मात्र रेफ्रींनी तो फेटाळला. व्हीएआरमध्ये मार्टिनेझ याची ऑफसाईड असल्याचे सांगितले गेले. त्या आधी मेस्सीचाही एक गोल ऑफसाईड ठरला होता. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला मेस्सीचा एक फटका सौदीच्या गोलकीपरने अडवला.

स्पर्धेपुर्वी अर्जेंटिनासाठी मेस्सीचा फिटनेस चिंतेचा विषय होता. तथापि, तो फिट असल्याचे सांगितले जात आहे. मेस्सीच्या गोल्डन बुट्सचा फोटोही समोर आला होता. अर्जेंटिना हा संघ यंदाच्या विश्वचषकाचा दावेदार मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT