Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty | Min Hyuk Kang - Seung Jae Seo AFP
क्रीडा

India Open 2024: शेवटपर्यंत लढले, पण सात्विक-चिरागच्या पदरी फायनलमध्ये निराशाच! कोरियाच्या जोडीला विजेतेपद

Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty: भारताची बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना इंडिया ओपन 2024 स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

Pranali Kodre

Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty lost doubles final to Korea's Min Hyuk Kang and Seung Jae Seo at India Open 2024:

दिल्लीत इंडिया ओपन 2024 स्पर्धा झाली, या स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र त्यांना रविवारी (21 जानेवारी) अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अंतिम सामन्यात त्यांना कोरियाच्या कांग मिन-ह्युक आणि सेओ सेंग-जे या जोडीने 15-21, 11-21, 18-21 अशा फरकाने तीन सेटमध्ये पराभूत केले. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा भारतीय जोडीला अंतिम सामन्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

सात्विक आणि चिराग यांना गेल्याच आठवड्यात मलेशिया ओपन 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चीनच्या वँग चँग आणि लियांग वेईकेंग यांनी पराभूत केले होते.

दरम्यान रविवारी इंडिया ओपनच्या अंतिम सामन्यात सात्विक आणि चिराग यांनी शेवटपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले होते. मात्र, 65 मिनिटे चाललेल्या या सामन्यात त्यांना चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही.

तथापि, या सामन्यात दोन्ही जोड्यांकडून काही शानदार रॅली पाहायला मिळाल्या. या सामन्यात चिराग आणि सात्विक यांनी पहिला गेम सहज जिंकला होता.

मात्र, दुसऱ्या गेममध्ये कांग - सेओ या जोडीने शानदार पुनरागमन केले. त्यांनी दुसऱ्या गेममध्ये मिळवलेली पकड ढिली होऊ दिली नाही आणि हा गेल 21-11 असा जिंकत सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे सामना निर्णायक गेममध्ये गेला.

निर्णायक आणि तिसऱ्या गेममध्ये चूरशीचा खेळ झाला. मात्र चिराग आणि सात्विकला आघाडी घेण्यापासून सातत्याने कांग - सेओ यांनी रोखले. या गेममध्ये चांगल्या रॅलीही झाल्या, मात्र कांग - सेओ यांनी आपली आघाडी सोडली नाही. अखेर दोन चॅम्पियन पाँइंट्स जिंकत त्यांनी हा गेमही जिंकला आणि विजेतेपदही जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT