भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) या सामन्याच्या दिवशी सोशल मीडियापासून दूर राहणार आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

T-20 World Cup 2021: भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी सानिया सोशल मीडियापासून दूर

जेव्हा भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सामना होतो. त्यावेळी दोन्ही देशांच्या प्रेक्षकांनी सानियाला जोरदार ट्रोल केले आहे. कारण तिचा पती शोएब मलिक (Shoaib Malik) पाकिस्तानकडून खेळतो आणि सानिया (Sania Mirza) भारताची आहे.

दैनिक गोमन्तक

टी -20 विश्वचषक (T20 World Cup) रणसंग्रामाला आजपासून सुरूवात होत आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) होणार आहे. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) या सामन्याच्या दिवशी सोशल मीडियापासून दूर राहणार आहे. सामन्यादरम्यान खराब वातावरण टाळण्यासाठी सानियाने हा निर्णय घेतला आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतो. त्यावेळी दोन्ही देशांच्या प्रेक्षकांनी सानियाला जोरदार ट्रोल केले आहे. कारण तिचा पती शोएब मलिक (Shoaib Malik) पाकिस्तानकडून खेळतो आणि सानिया भारताची आहे.

काय सानिया म्हणाली?

सानिया मिर्झाने इन्स्टाग्रामवर लिहिले, 'भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दिवशी वाद टाळण्यासाठी मी सोशल मीडियावरून दूर जाणार आहे. बाय बाय.' सानियाने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केले आहे. शोएब टी -20 विश्वचषक खेळणाऱ्या पाकिस्तान संघाचा सदस्य आहे. यापूर्वी मलिकची संघात निवड झाली नव्हती, पण तो सोहेब मकसूदच्या जागी परत आला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे सोहेब टी -20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

मलिक 2009 च्या विश्वचषक विजेत्या पाकिस्तान संघाचा सदस्य होता. युनूस खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने 2009 मध्ये विश्वचषक जिंकला. शोएब मलिक त्या संघाचा सदस्य होता. त्याचबरोबर शोएब 2007 साली पहिल्यांदा खेळल्या गेलेल्या टी -20 विश्वचषकात पाकिस्तान संघाचा कर्णधार होता. 2007 च्या विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरुद्ध अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. शोएब आतापर्यंत झालेल्या सर्व टी -20 विश्वचषकात पाकिस्तान संघाचा सदस्य आहे.

2007 पासून 6 विश्वचषक खेळले गेले. त्यातील 5 विश्वचषकांमध्ये मलिक पाकिस्तान संघाचा सदस्य राहिलेला आहेत. शोएबला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22 वर्षांचा अनुभव आहे. त्याने विश्वचषकात 28 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 32.11 च्या सरासरीने 546 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT