Sangeeta Phogat Dainik Gomantak
क्रीडा

Sangeeta Phogat: देशात ब्रिजभूषणविरुद्ध लढत असताना संगीतानं परदेशात रोवला विजयाचा झेंडा

Sangeeta Phogat : वर्ल्ड रँकिंग सिरिज स्पर्धेत संगीता फोगटने पदक जिंकले आहे.

Pranali Kodre

Sangeeta Phogat Wins Bronze Medal Hungary Ranking Series tournament: भारताची कुस्तीपटू संगीता फोगटने पुन्हा एकदा देशाची मान उंचावली आहे. तिने हंगेरीतील बुडापेस्ट येथे वर्ल्ड रँकिंग सिरिज स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे. संगीता गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग विरुद्ध आंदोलन करणाऱ्या 6 कुस्तीपटूंपैकी एक आहे.

संगीताने 59 किलोग्रॅम वजनी गटात हंगेरीची युवा कुस्तीपटू विक्टोपिया बोरसोसला पराभूत करत करत कांस्यपदकाची कमाई केली. संगीताला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

पण तिने कांस्य पदकाच्या सामन्यात विक्टोरियाला 6-2 अशा फरकाने पराभूत केले. संगीता अमेरिकेच्या जेनिफर पेज रॉजर्सविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर रेपेचेज राऊंडमधून उपांत्य फेरीत पोहचली होती.

संघर्ष करणाऱ्या महिलांना पदक समर्पित

दरम्यान, संगीताने हे पदक संघर्ष करणाऱ्या महिलांना समर्पित केले आहे. तिने ट्वीट केले आहे की 'तुमच्या सर्वांचे शुभेच्छांचे संदेश माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. यावेळी मी खूप भावूक आहे. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हे पदक फक्त माझे नाहीये, तुमच्या सर्वांचे आहे. मी हे पदक जगातील त्या सर्व संघर्ष करणाऱ्या महिलांना समर्पित करते, ज्या महिल्यांविरुद्ध झालेल्या गुन्ह्याविरुद्ध लढत आहेत. जय हिंद.'

विनेशने घेतलेले नाव मागे

या स्पर्धेत विनेश फोगटही सहभागी होणार होती. पण तिने ताप आणि अन्नातून विषबाधा झाल्याच्या कारणामुळे या स्पर्धेतून माघार घेतली. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंसाठी एशियाड ट्रायल्सआधी झालेली ही स्पर्धा महत्त्वाची आहे.

कुस्तीपटूंचे आंदोलन

ब्रिजभूषणवर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करण्याचा आरोप काही भारतीय कुस्तीपटूंनी केला आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी आंदोलन सुरु केले होते. ब्रिजभूषणवर कारवाई केली जावी अशी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची मागणी आहे. या आंदोलनात संगीतासह तिचा पती आणि भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक हे स्टार कुस्तीपटूही सहभागी आहेत.

या आंदोलनानंतर 15 जून रोजी दिल्ली पोलिसांकडून 1000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, पॉक्सो प्रकरणातून त्यांना क्लीन चीट मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Mahika Sharma: हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिकानं दाखवलं आईचं रुप! चिमुकल्या अगस्त्यसाठी गर्दीत बनली 'ढाल' Watch Video

8th Pay Commission: नोकरी सरकारी, थाट 'लक्झरी'! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार 'बंपर' वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब पालटणार

VIDEO: अरेरे! रेड कार्पेटवर पाकिस्तानी उपपंतप्रधान तोंडावर पडले, सुरक्षारक्षकांनी कसंबसं सावरलं; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT