Sai Sudharsan X/BCCI
क्रीडा

SA vs IND: IPL लिलाव चालू असताना द. आफ्रिकेत साई सुदर्शनचा मोठा धमाका! 36 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी

Sai Sudharsan: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत साई सुदर्शनने अर्धशतक करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 2nd ODI at Gqeberha, Sai Sudharsan Record :

मंगळवारी दुबईमध्ये इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाचा लिलाव झाला. याचवेळी मंगळवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील वनडे मालिकेचा दुसरा सामना गेकेबेराला खेळवण्यात येत आहे.

या वनडे सामन्यात भारताचा युवा फलंदाज साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. होते. मात्र, भारतीय संघाचा डाव 46.2 षटकात 211 धावांवर संपुष्टात आला. पण भारताची फलंदाजी फारशी बहरली नसली, तरी युवा साई सुदर्शनने प्रभाव पाडला.

साई सुदर्शनने 83 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 62 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे हा त्याला कारकिर्दीतील दुसराच वनडे सामना आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गला झालेल्या पहिल्या वनडेतून पदार्पण केले होते. त्या सामन्यातही त्याने नाबाद 55 धावांची खेळी केली होती.

त्यामुळे कारकिर्दीतील पहिल्या दोन वनडे सामन्यात अर्धशतक करणारा तो भारताचा दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी भारताकडून असा विक्रम 1987 साली नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला होता.

त्यांनी 1987 साली वनडेत पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात 73 आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या दुसऱ्या सामन्यात 75 धावांची खेळी केली होती.

भारतीय संघ 211 धावांत सर्वबाद

भारताकडून मंगळवारी होत असलेल्या वनडेत साई सुदर्शन व्यतिरिक्त कर्णधार केएल राहुलने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र अन्य कोणालाही 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

भारताकडून सुदर्शन आणि केएल राहुल व्यतिरिक्त फक्त तिलक वर्मा (10), संजू सॅमसन (12), रिंकू सिंग (17) आणि अर्धशदीप सिंग (18) यांनीच दोन आकडी धावसंख्या पार केली. मात्र, त्यांच्यापैकी कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव २११ धावांतच संपुष्टात आला.

दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच ब्युरान हेंड्रिक्स आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर लिझाद विल्यम्स आणि कर्णधार एडेन मार्करम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT