Rituraj Gaikwad Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021 Orange Cap: ऋतुराज गायकवाडने ऑरेंज कॅप जिंकत रचला इतिहास

ऋतुराज गायकवाडने (Rituraj Gaikwad) सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकली.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीग 2021 (Indian Premier League 2021) च्या अंतिम सामन्यात ऑरेंज कॅपचा (Orange Cap) विजेता निश्चित झाला. ऋतुराज गायकवाडने (Rituraj Gaikwad) सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ऋतुराजने फक्त 2 धावांनी ऑरेंज कॅप जिंकली. ऋतुराज गायकवाडला त्याच्याच संघातील सहकारी फाफ डु प्लेसिस यांच्यात स्पर्धा लागली होती. ज्याने 633 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 635 धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली.

अंतिम सामन्यात डु प्लेसिसने 59 चेंडूत 86 धावा केल्या, त्याची केवळ 2 धावांमुळे ऑरेंज कॅप जिंकण्याची संधी हुकली. दुसरीकडे, चेन्नईचा डाव संपल्यानंतर ऋतुराज गायकवाडने दिल को छु जाने वाले वक्तव्य केले. ऋतुराज म्हणाला की ऑरेंज कॅप जिंकण्याची माजी इच्छा नव्हती. डु प्लेसिसने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकायला पाहिजे होता. मात्र डु प्लेसिस शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. जर त्याने मारलेला शॉट स्टेडीयमच्या बाहेर गेला असता तर ऑरेंज कॅप त्याची झाली असती.

ऋतुराजने आयपीएलमध्ये इतिहास रचला

ऋतुराज म्हणाला, 'मला वाटत होते की, डु प्लेसिसने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकायला पाहिजे होता कारण तो संघासाठी अधिक महत्त्वाचा ठरला असता. आपल्याला सांगू की ऋतुराज गायकवाडने ऑरेंज कॅप जिंकून इतिहास रचला आहे. ऑरेंज कॅप जिंकणारा तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू आहे. ऋतुराजने केवळ 24 वर्षे, 257 दिवसांच्या वयात ऑरेंज कॅप जिंकली आहे. गायकवाड यांनी 24 वर्षे 328 दिवसांच्या वयात ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या शॉन मार्शचा विक्रम मोडला. विराट कोहलीने 27 वर्षे 206 दिवसांच्या वयात ऑरेंज कॅप मिळवली. गायकवाड चेन्नई सुपर किंग्जसाठी एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला आहे. मायकेल हसीने 2013 मध्ये चेन्नईसाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक 733 धावा केल्या.

डू प्लेसिस आणि गायकवाड यांचा गौरव

फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी आयपीएल 2021 मध्ये अप्रतिम कामगिरी केली. दोन्ही सलामीवीरांनी चेन्नईच्या फलंदाजीचा संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेतला. चेन्नईसाठी प्रथमच दोन फलंदाजांनी एका हंगामात 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. हा पराक्रम RCB ने दोनदा केला आहे. ख्रिस गेल आणि विराट कोहलीने (Virat Kohli) 2013 मध्ये आणि विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने 2016 मध्ये हा पराक्रम केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ना ढोल-ताशा, ना मंडप… थेट हॉस्पिटलच्या बेडवरच पठ्ठ्यानं केलं लग्न, व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, 'हा पक्का सरकारी नोकरीवाला असणार'

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

Sawantwadi Gambling Raid: सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर सावंतवाडीतील 4 मटका-जुगार अड्ड्यांवर धाड; 8 जणांवर कारवाई

SCROLL FOR NEXT