Ruturaj Gaikwad Dainik Gomantak
क्रीडा

Ruturaj Gaikwad: ऋतुराज काही थांबेना! ठोकलंय सलग तिसरं शतक, पाहा Video

विजय हजारे ट्रॉफी 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऋतुराज गायकवाडने शतकी खेळी केली आहे.

Pranali Kodre

विजय हजारे ट्रॉफी 2022 या एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेतील अंतिम सामना शुक्रवारी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र संघात खेळला जात आहे. या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने शतकी खेळी केली. हे त्याचे सलग तिसरे आणि स्पर्धेतील यावर्षीचे चौथे शतक आहे.

सलामीला फलंदाजीला आलेल्या ऋतुराजने 131 चेंडूत 108 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकार मारले आहेत. त्याने ही खेळी करताना सत्यजीत बचावबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची आणि अझिम काझीबरोबर चौथ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. पण तो 42 व्या षटकात प्रेरक मंकडकडून धावबाद झाला.

दरम्यान ऋतुराजने या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध 220 धावांची द्विशतकी खेळी केली होती. तसेच नंतर उपांत्य सामन्यात आसामविरुद्ध 168 धावा केल्या होत्या. तसेच साखळी फेरीत त्याने रेल्वेविरुद्ध नाबाद 124 धावांची खेळी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT