Bhakti Kulkarni Dainik Gomantak
क्रीडा

राष्ट्रीय महिला जेतेपद पटकावलेल्या भक्तीसमोर रशियन खेळाडूचे आव्हान

पहिल्या फेरीत रशियन खेळाडूचे (Russian Players) आव्हान असेल. स्पर्धा रशियातील सोची (Sochi) येथे सोमवारपासून खेळली जाईल.

दैनिक गोमन्तक

पणजी: महिलांच्या फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेली गोमंतकीय इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णी (Bhakti Kulkarni) हिच्यासमोर पहिल्या फेरीत रशियन खेळाडूचे आव्हान असेल. स्पर्धा रशियातील सोची (Sochi) येथे सोमवारपासून खेळली जाईल.

स्पर्धेच्या संकेतस्थळानुसार, सलग दोन वेळा राष्ट्रीय महिला विजेतेपद पटकावलेली भक्ती या प्रतिष्ठित स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रशियाची वूमन ग्रँडमास्टर अनास्तासिया परम्झिनी हिच्याविरुद्ध खेळेल. हा डाव जिंकल्यास भक्तीची दुसऱ्या फेरीत रशियाचीच वूमन ग्रँडमास्टर नतालिया पोगोनिना हिच्याशी गाठ पडेल. स्पर्धेत महिला गटात जगभरातील 103 खेळाडूंचा समावेश असून स्पर्धा बाद फेरी पद्धतीने खेळली जाईल.

फिडेच्या मानांकनात 29 वर्षीय भक्तीचे स्टँडर्ड प्रकारात 2391 एलो गुण असून 23 वर्षीय रशियन अनास्तासिया हिचे 2256 एलो गुण आहेत. गतवर्षी महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने झालेल्या ऑलिंपियाड व आशिया नेशन्स कप स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या भारतीय संघात भक्तीचा समावेश होता. आता विश्वकरंडक स्पर्धेमुळे तिला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT