RCB Player Dainik Gomantak
क्रीडा

RCB Vs GG, WPL 2023: स्मृतीची RCB दुसऱ्यांदा जिंकली, गुजरात जायंट्सचा 8 गडी राखून पराभव

RCB Vs GG, WPL 2023: महिला प्रीमियर लीगच्या 16व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात जायंट्सचा 8 गडी राखून पराभव केला.

Manish Jadhav

RCB Vs GG, WPL 2023: महिला प्रीमियर लीगच्या 16व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात जायंट्सचा 8 गडी राखून पराभव केला.

बंगळुरुचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी बंगळुरुने यूपी वॉरियर्सचा पराभव केला. तर गुजरात जायंट्सचा हा पाचवा पराभव आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 188 धावा केल्या.

प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सोफी डिवाइनच्या धडाकेबाज खेळीमुळे 27 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. बंगळुरुची सलामीवीर सोफी डिवाइन शतक झळकावण्यात केवळ एक धाव चुकली.

दरम्यान, लॉरा वुल्फार्टच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 20 षटकांत 4 गडी गमावून 188 धावा केल्या.

गुजरातकडून लॉराने सर्वाधिक धावा केल्या. तिने 42 चेंडूत 68 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. तर, आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने दोन बळी घेतले. गुजरातने शेवटच्या पाच षटकात 67 धावा केल्या.

दुसरीकडे, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या सोफिया आणि लॉरा यांनी चांगली सुरुवात केली. सोफिया 16 धावा करुन बाद झाली. पण लॉरा एका बाजूकडून शानदार फलंदाजी करताना दिसली. मेघनाने 32 चेंडूत 31 धावा केल्या.

गार्डनरने 26 चेंडूत 41 धावा केल्या. तिने या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचबरोबर, हरलीन आणि हेमलता यांनी शेवटच्या षटकात दमदार फलंदाजी करत 22 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT