RCB Dainik Gomantak
क्रीडा

तो परत आला...! IPL 2023 मध्ये करत होता कॉमेंट्री, आता थेट RCB कडून खेळणार सामने

आयपीएल 2023 स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 38 वर्षीय खेळाडूला संघात स्थान दिले आहे.

Pranali Kodre

RCB announced injury replacement for David Willey: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. पण असे असले तरी खेळाडूंच्या दुखापती संघांची पाठ सोडण्याचे नाव घेईना. त्यामुळे अनेक संघ बदली खेळाडूंना संघात सामील करताना दिसत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने देखील केदार जाधवला सोमवारी एका बदली खेळाडू म्हणून संघात सामील केले असल्याचे घोषित केले आहे.

बेंगलोरने दिलेल्या माहितीनुसार केदार जाधवला डेव्हिड विली याचा बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. त्याला 1 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. विशेष म्हणजे केदार आयपीएल 2023 लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर तो याच हंगामात मराठी समालोचनही करत होता.

पण आता त्याला बेंगलोरने संघात सामील केले असल्याने तो मैदानात खेळतानाही दिसू शकतो. केदार यापूर्वी 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून अखेरचा आयपीएल सामना खेळला होता.

दरम्यान, विलीला बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना पायाच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला आयपीएल 2023 मधून बाहेर व्हावे लागले आहे. तो परत इंग्लंडला परत गेला आहे.

38 वर्षीय केदारला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. त्याने यापूर्वीही बेंगलोर संघाकडून आयपीएल खेळले आहे. तो 2016 आणि 2017 साली बेंगलोरकडून 17 सामने खेळला. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोची टस्कर्स केरला आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

त्याने आत्तापर्यंत 93 आयपीएल सामने खेळले असून 123.17 च्या सरासरीने 1196 धावा केल्या आहेत. आता त्याला यंदा बेंगलोर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी देणार का हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, 2020 साली भारताकडून अखेरचा सामना खेळणाऱ्या केदारच्या नजीकच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास तो महाराष्ट्राकडून रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेत खेळला. यामध्ये त्याने शानदार कामगिरीही केली. त्याने मुंबईविरुद्ध 128 आणि 2 धावा, हैदराबादविरुद्ध 71 धावा, तमिळनाडूविरुद्ध 56 आणि 15 धावा, आसामविरुद्ध 283 धावा केल्या होत्या.

बेंगलोर संघाला 2023 आयपीएलमध्ये विल जॅक्स, रजत पाटीदार, रिस टोपली या खेळाडूंच्या दुखापतीचाही फटका बसला आहे. या खेळाडूंनाही दुखापतीमुळे या हंगामातून माघार घ्यावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT