Team India Video Dainik Gomantak
क्रीडा

Team India Video: विराट, रोहितसह टीम इंडिया ब्रायन लाराच्या भेटीला; फॅन्सचाही दिवस बनवला 'स्पेशल'

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाने दिग्गज ब्रायन लारा यांची भेट घेतली, तसेच त्रिनिदादमध्ये चाहत्यांचा दिवसही स्पेशल बनवला.

Pranali Kodre

Team India cricketers catching up with West Indies legend Brain Lara: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या दोन्ही संघात कसोटी मालिका सुरू असून दुसरा सामना 20 जुलैपासून त्रिनिदादला सुरु होणार आहे. या सामन्यासाठी सध्या भारतीय संघ त्रिनिदाद मधील पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर सराव करत आहे.

याच सरावा दरम्यान मैदानात भारतीय खेळाडूंची दिग्गज ब्रायन लारा यांच्याशी भेट झाली. या भेटीचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की आधी लारा फोनवर बोलत असताना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तिथे आला. त्यावेळी ते दोघेही एकमेकांशी संवाद साधताना दिसले.

त्यानंतर भारतीय संघातील रविंद्र जडेजा, केएस भरत, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे यांच्याबरोबरच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही लारा यांची भेट घेतली. तसेच लारा हे नंतर ऋतुराज गायकवाड आणि रोहित शर्माबरोबर देखील चर्चा करताना दिसले.

या व्हिडिओला बीसीसीआयने कॅप्शन दिले आहे की 'त्रिनिदादमध्ये असताना तुम्ही दिग्गज ब्रायन लाराला भेटण्याची संधी चुकवू शकत नाही.'

लारा परफॉर्मन्स मेंटर

भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजने लारा यांना संघाचा परफॉर्मन्स मेंटर म्हणून नियुक्त केले होते. लारा वेस्ट इंडिजविरुद्ध अनेकवर्षे खेळला आहे. त्याने वनडे आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारात 10 हजारांहून अधिक धावाही केल्या आहेत. कसोटीत सर्वोच्च 400 धावांची खेळी करण्याचा विक्रमही लाराच्या नावावर आहे.

चाहत्यांचा दिवसही स्पेशल

दरम्यान, भारतीय खेळाडूंनी त्रिनिदादमध्ये क्रिकेट चाहत्यांचाही दिवस खास बनवला. स्टेडियममध्ये आलेल्या चाहत्यांना भारतीय खेळाडूंनी स्वाक्षऱ्या दिल्या. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर फोटोही काढले.

या क्षणाचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सची जर्सी घालूनही दोन चाहते रोहितला भेटल्याचे दिसते. रोहित आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करतो.

भारत आणि वेस्ट इंडिजमधील कसोटींचे शतक

दरम्यान, 20 जुलैपासून होणारा भारत आणि वेस्ट इंडिज संघातील सामना खास असणार आहे. हा दोन्ही संघात होणारा 100 वा कसोटी सामना असणार आहे. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 99 कसोटी सामने झाले आहेत. या 99 सामन्यांपैकी भारतीय संघाने 23 सामने जिंकले आहेत, तसेच 30 सामने पराभूत झाले आहेत. याशिवाय 46 सामने अनिर्णित राहिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT