Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: न्यूझीलंडविरुद्ध या 5 स्फोटक फलंदाजांनी केल्या सर्वाधिक धावा !

India vs New Zealand 1st T20: भारतीय फलंदाजी संपूर्ण जगात सर्वात मजबूत मानली जाते.

दैनिक गोमन्तक

India vs New Zealand 1st T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 टी-20 मालिकेतील पहिला सामना 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन येथे होणार आहे. भारतीय फलंदाजी संपूर्ण जगात सर्वात मजबूत मानली जाते. त्याचबरोबर न्यूझीलंडकडे ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीसारखे धोकादायक गोलंदाज आहेत. न्यूझीलंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे पाच भारतीय फलंदाज आहेत, परंतु त्यापैकी एकाने निवृत्ती घेतली आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

दरम्यान, रोहित शर्माने (Rohit Sharma) भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 17 सामन्यात 511 धावा केल्या. तर भारताचा स्टार सलामीवीर केएल राहुलने (KL Rahul) किवी संघाविरुद्ध 8 सामन्यात 322 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो स्फोटक फलंदाजीत माहिर आहे.

तसेच, विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने टीम इंडियासाठी (Team India) अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या 10 सामन्यात 311 धावा केल्या आहेत. महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) ने न्यूझीलंड विरुद्ध 11 सामन्यात 223 धावा केल्या आहेत, परंतु स्टार यष्टीरक्षक आणि करिष्माई कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

शिवाय, श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध 11 सामन्यात 212 धावा केल्या आहेत. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीचे सर्वांनाच वेड आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT