Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

रोहित शर्मा कोरोनाबाधित ; भारतीय संघाची धुरा कोण सांभाळणार ?

टीम इंडियाला कर्णधार रोहितशिवायही पहिली कसोटी खेळावी लागू शकते.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. भारताला 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे, जो गेल्या वर्षी कोरोनामुळे होऊ शकला नव्हता, पण यावेळीही हा सामना कोरोनामुळे धोक्यात आहे. शनिवारी झालेल्या सराव सामन्यात रोहित शर्माने फलंदाजी केली नाही. यामागचे कारण कोणालाच समजले नाही. रात्री उशिरा त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले.

आता टीम इंडियाला कर्णधार रोहितशिवायही पहिली कसोटी खेळावी लागू शकते. अशा परिस्थितीत ऋषभ पंत टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो. तथापि, रोहितलाही तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे, कारण इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेदरम्यान केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांनाही कोरोनाची लागण झाली होती, परंतु दोघेही तिसरा कसोटी सामना खेळत आहेत.

रॅपिड अँडिजन टेस्टमध्ये रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यानंतर त्याला संघापासून वेगळे करण्यात आले असून बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याची काळजी घेतली जात आहे. आता रोहितला सतत आरटीपीसीआर चाचण्या द्याव्या लागतील आणि तो कोरोनामधून बरा होईपर्यंत त्याला आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. जर RTPCR चाचणी सतत निगेटिव्ह आली तर रोहित लवकरच टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT