Rohit Sharma - Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup: '3 दिवस, 2 सामने अन् 2 विजय...', फायनलमध्ये पोहचल्यानंतर रोहित शर्माची पोस्ट चर्चेत

Rohit Sharma Post: भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे, त्यानंतर रोहित शर्माने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Post After India vs Sri Lanka Match:

आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फोर फेरीत मंगळवारी कोलंबोला झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध 41 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने केलेले ट्वीट चांगलेच चर्चेत आले.

भारताने 24 तासात दोन मोठे विजय मिळवल्यानंतर आता विश्रांती घेण्याची वेळ असल्याचे रोहितने त्याच्या ट्वीटमधून म्हटले आहे.

भारताने आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीत सोमवारी पाकिस्तानला 228 धावांनी पराभूत केले होते, त्यानंतर लगेचच मंगळवारी श्रीलंकेलाही पराभूत केले.

खरंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी सुरू झाला होता. मात्र, रविवारी पावसाचा मोठा व्यत्यय आल्याने सोमवारी राखीव दिवशी हा सामना पूर्ण करण्यात आला होता. त्यामुळे भारतीय संघ सलग तीन दिवस मैदानात उतरला होता.

याचबद्दल रोहित शर्माने त्याच्या ट्वीटमधून आठवण करून दिली आहे, त्याने ट्वीट केले की '3 दिवस, 2 सामने, 2 विजय. गुड नाईट.'

दरम्यान, रोहित शर्मा या दोन्ही सामन्यात चांगला खेळला आहे. त्याने दोन्ही सामन्यात सलामीला खेळताना ताबडतोड अर्धशतक झळकवले. पाकिस्तानविरुद्ध रोहितने 56 धावांची खेळी केली, तर श्रीलंकेविरुद्ध डावात सर्वोच्च 53 धावांची खेळी केली होती. तो या स्पर्धेत सध्या सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.1 षटकात सर्वबाद 213 धावा केल्या. भारताकडून रोहित व्यतिरिक्त केवळ इशान किशन आणि केएल राहुल यांनाच 30 धावांचा टप्पा पार करता आला. इशानने 33 धावांची खेळी केली, तर केएल राहुलने 39 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालागेने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 41.3 षटकात 172 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून फलंदाजीवेळीही वेलालागेने सर्वाधिक 42 धावांनी नाबाद खेळी केली. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT