Rohit Sharma & Rinku Singh Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AFG: रोहित शर्माचं वादळ अन् रिंकू सिंहची 'दादागिरी', 3 वर्ल्ड रेकॉर्ड केले नावावर!

IND vs AFG 3rd T20I: प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा डाव गडगडला. पाचव्या षटकापर्यंत संघाने 22 धावांत चार विकेट गमावल्या होत्या.

Manish Jadhav

Rohit Sharma-Rinku Singh, IND vs AFG 3rd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा सामना बंगळुरु येथे सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा डाव गडगडला. पाचव्या षटकापर्यंत संघाने 22 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर, दुहेरी आर जोडी म्हणजे रिंकू सिंह आणि रोहित शर्मा यांनी शानदार फलंदाजी केली.

या दोघांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोन्ही खेळाडूंच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 4 गडी गमावून 212 धावा केल्या. या दोघांनी 190 धावांची नाबाद पाटर्नशिप केली. विशेष म्हणजे, दोघांनी मिळून तीन मोठे विश्वविक्रमही आपल्या नावावर केले. चला तर मग या विश्वविक्रमांबद्दल जाणून घेऊया...

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये भारताने कोणत्याही विकेटसाठी केलेली सर्वोच्च भागीदारी

190* रोहित शर्मा- रिंकू सिंह विरुद्ध अफगाणिस्तान, बंगळुरु 2024

176 संजू सॅमसन-दीपक हुडा विरुद्ध आयर्लंड डब्लिन 2022

165 रोहित शर्मा-केएल राहुल विरुद्ध श्रीलंका, इंदूर 2017

165 यशस्वी जयस्वाल-शुभमन गिल विरुद्ध वेस्ट इंडिज, लॉडरहिल 2023

2- टी-20 आंतरराष्ट्रीय षटकात सर्वाधिक धावा

युवराज सिंग- 36 धावा, इंग्लंड विरुद्ध (स्टुअर्ट ब्रॉड, 2007)

किरॉन पोलार्ड- 36 धावा, विरुद्ध श्रीलंका (अकिला धनंजय, 2021)

रोहित शर्मा, रिंकू सिंह- 36 धावा, विरुद्ध अफगाणिस्तान (करीम जनत, 2024)

3- T20I मध्ये पाचव्या किंवा त्यापेक्षा कमी विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी

दरम्यान, रिंकू सिंह आणि रोहित शर्मा यांची ही भागीदारी टी-20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील पाचव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी, नेपाळच्या दीपेंद्र आयरे आणि कुशल मल्ला यांनी 2023 मध्ये हाँगकाँगविरुद्ध 145 धावांची भागीदारी केली होती.

रोहित शर्माचे शानदार शतक

रोहित शर्माने या डावात 69 चेंडूत 121 धावांची नाबाद शतकी खेळी केली. रोहितने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 8 षटकार ठोकले तर रिंकू सिंहने 39 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या. रिंकूने त्याच्या इनिंगमध्ये दोन चौकार आणि 6 षटकार मारले. या दोघांनी 93 चेंडूत 190 नाबाद धावा जोडल्या. यामुळे टीम इंडियाने अफगाणिस्तानला 213 धावांचे लक्ष्य दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT