Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma आठव्यांदा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शून्यावर आऊट

IND Vs WI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये खाते न उघडता बाद झाला असुन लाजिरवाना विक्रम बनवला आहे.

दैनिक गोमन्तक

रात्री उशिरा सेंट किट्स येथे वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाला 5 विकेट्सनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरला. तो सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. यासोबतच रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) हा भारतासाठी टी20 (T20) आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा बाद होणारा खेळाडू आहे. रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही 8वी वेळ होती. या यादीत रोहित शर्मानंतर केएल राहुलचा नंबर येतो. केएल राहुल टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खाते न उघडता चार वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

मात्र, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची नावे आणखी एका खास यादीत येतात. रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी 4 शतके झळकावली आहेत. या प्रकरणात केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सेंट किट्समध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. भारताचा (India) संपूर्ण संघ 19.4 षटकात 138 धावा करून ऑलआऊट झाला. या सामन्यात भारताकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. वेस्ट इंडिजने हे लक्ष्य 19.2 षटकांत 5 विकेट्स गमावून अगदी सहज गाठले.

मात्र, तरीही भारताला मालिकेत पुनरागमन करण्याची मोठी संधी आहे. दोन्ही देशांमधला तिसरा टी-20 सामना 2 ऑगस्टला होणार आहे. मात्र, भारतीय वेळेनुसार आता तिसरा टी-20 सामना रात्री 8 ऐवजी रात्री 9.30 वाजता सुरू होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT